Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक महाराष्ट्र मोठी बातमी राजकारण

त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान,पुंजानी यांची याचिका उद्याच सुनावणी…!

राज्य निवडणूक आयोगा चा कारभार सद्या राज्यात चर्चेचा विषय असून आधीच इतर मागासवर्गीय आरक्षण मुद्यांमुळे ९ वर्षा नंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत
पहिल्या टप्प्यात नगर पालिका नगर परिषद नगरपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्या त्या नुसार झालेल्या निवडणुकीची मतमोजणी ही २ डिसेंबर रोजी होणार होती मात्र निवडणुकीच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल हा २३ डिसेंम्बर रोजी देण्यात यावा असा निकाल दिला त्यामुळे राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
पण न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारावा लागतो असे मुख्यमंत्री म्हणाले.मात्र फार दिवस मतमोजणी लांबली तर घोटाळा होण्याची शक्यता विरोधकांनी व्यक्त केली मात्र त्या विरोधात कुठलेही ठोस पाऊल उचलले नव्हते.
मात्र आता हे प्रकरन पुन्हा सुप्रीम कोर्ट मध्ये पोहचले आहे मात्र ते कोणत्याही मुख्य विरोधका ने नेले नसून वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाद्यक्ष युसूफ पुंजानी यांनी नेले आहे.

नगर परिषद मतमोजणी प्रकरण उद्या सुप्रीम कोर्टात!

AIMIM चे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी आणि राजकिरण बर्वे यांनी दाखल केलेल्या विशेष याचिकेवर उद्याच सुनावणी. २ डिसेंबर २०२५ च्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाला दिलेले आव्हान — आता निर्णय सुप्रीम कोर्टात!

फक्त २ दिवसांत मतमोजणी करण्याची मागणी
आताची सुनावणी निर्णायक ठरणार!

सर्व जिल्ह्याची नजर आता दिल्लीकडे लागली आहे.

Related posts

सादिक शेख यांनी हाती बांधले घड्याळ न.प.निवडणुकी च्या तोंडावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का..!

bol maharashtra

पंचायत राज अभियानात कर सवलतीचा लाभ घेण्याचे ग्रामसेवक गजभिये यांचे आसरा ग्रामस्थांना आवाहन…!

bol maharashtra

आर्णी च्या प्रचार सभेत ना.संजय भाऊ राठोड यांची तुफान फटकेबाजी..!

bol maharashtra