Bol Maharashtra
गुन्हा मोठी बातमी

आरोपीला गजाआड करणारा गेला पिंजऱ्यात.. त्या लाचखोर अधिकाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी..!

यवतमाळ शहरातील अवधुतवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यास एक लाख रुपयांची लाच घेतांना त्यांच्या पोलीस स्टेशन च्या कक्षात अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रंगेहात पकडले अन यवतमाळ पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
एसीबी ने रणधीर यांच्या भाड्याच्या घराची झडती घेतली असता घरात १ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम,
११ तोळे सोन्याचे दागिने व स्थावर मालमत्तेचे काही दस्तावेज आढळून आले यात यवतमाळ शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या एका भुखंड खरेदी खत आढळले त्याची किंमत सुमारे २५ लाख असावी. गुरुवारी झालेली कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरू होती त्या नंतर अटक केलेल्या पोलीस निरीक्षक रणधीर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ठाणेदार आपल्या एका खासगी फंटर च्या माध्यमातून वसुली करून संपत्ती त्याचे जवळ ठेवत असल्याची कुणकुण एसीबीला लागली एसीबी चे पथक त्याचा शोध घेत होते मात्र तो फंटर पोबारा झाला असल्याचे कळते.
आरोपींना गजाआड करणाऱ्या अधिकाऱ्यास स्वतः पिंजऱ्यात जावे लागले कारवाई करून रणधीर यास न्यायालयात नेत असतांना बघ्या लोकांची मोठी गर्दी उसळली होती.
अमाप संपत्ती जमवण्याचा हव्यास माणसाला कुठे नेईल हे सांगता येत नाही.
अधिकारी वर्ग हा लाचेची अवैद्य माया जमवतात ही संपत्ती त्या त्या ठिकाणी एखादा खासगी व्यक्ती हाताशी धरून त्याचे जवळ जमा करतो हे चित्र सर्वत्र असते आर्णी शहरात देखील काही अधिकारी वर्गानी सेवेत असताना कमावलेली माया आपल्या फंटर च्या नावे केल्याची चर्चा आहे
मात्र काही प्रकरणात कथित फंटर ने सर्व संपत्ती स्वाहा करून डकार देखील दिली नसल्याची आजह खमंग चर्चा आर्णी शहरात असते.

Related posts

जेफ्री एफस्टीन फाईल कडे जगाचे लक्ष..भारतिय राजकारनात होईल भूकंप…?

bol maharashtra

मागितली ‘लाच’ पडली ए सी बी ची ‘टाच’….वर्दीतल्या हावरट अधिकाऱ्या वरील करवाई ने पोलीस दलात खळबळ…!

bol maharashtra

आर्णी नगरपरिषद कर मूल्य निर्धार आक्षेपास मुदतवाढ,गणेश हिरोळे यांच्या मागणीस यश…!

bol maharashtra