Bol Maharashtra
कृषी ब्रेकिंग मोठी बातमी सामाजिक

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला महसूल विभागाच्या मिशन उभारी ने दिली मायेची ऊब…!

शेतकरी आत्महत्या हा एक कलंक असून त्यात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे म्हणूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हाचे पंतप्रधान पदाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांनी आर्णी तसलुक्यात दाभडी गावात शेतकरी प्रश्नावर चाय पे चर्चा कार्यक्रम घेतला होता.

त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात आले होते.

आता जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सर्व शासकीय कृषी योजनेचा लाभ देऊन दिलासा देण्यासाठी मिशन उभारी अभियान जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावात राबविण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनात आर्णी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ,नायब तहसिलदार उदय तुंडलवार,नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाने नायब तहसिलदार आदमूलवाड आदींनी सर्व मंडल अधिकारी, तलाठी यांनी

तहसील कार्यालय आर्णी अंतर्गत मिशन उभारी या आत्महत्या कुटुंबा तील वारसांना विविध योजनांचा लाभ देणे संदर्भात आज नवीन वर्षाच्या निमित्ताने मागील पाच वर्षात झालेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय कृषी अधिकारी कार्यालय व हाजी नासिर यांच्या सहकार्याने किराणा किट व ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले लाभार्थी अंदाजे ५२ते ६० संपूर्ण तालुका वर वाटप करून मायेची फुंकर मारण्यात आली.

Related posts

पैसे कमवण्याच्या नादात सोशीएल मीडियातून धार्मिक चुकीचा प्रचार…!

bol maharashtra

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्राताईंनी केली भावूक पोस्ट,स्व.दादांची शिकवण हेच बळ..!

bol maharashtra

काका पुतण्या च्या युतीला अमित शहाचा हिरवा कंदील…!

bol maharashtra