Bol Maharashtra
ब्रेकिंग

“मुंडेंचा रुद्रावतार! गुटखा विक्रेत्यांवर आता थेट मकोका”

**मुंबई | विशेष प्रतिनिधी**

राज्यातील गुटखा, पानमसाला व प्रतिबंधित तंबाखू पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरोधात आता थेट **महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका)** अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात गुटखा माफियांनी उभारलेल्या अवैध साखळीला आळा घालण्यासाठी FDA आणि पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाया अधिक तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करून अटक करण्यावर भर देण्यात येणार आहे.

मुंडे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नियमित तपासण्या, धाडी आणि गुप्त माहितीच्या आधारे विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गुटखा विक्रीवर लक्ष ठेवून दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही त्रास दिला जाणार नसून केवळ बेकायदेशीरपणे गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांवरच कारवाई होणार असल्याचे FDA प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे राज्यभरातील गुटखा विक्रेते, साठेबाज आणि तस्करांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात धडक कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts

रेती अभावी जवळ्यात घरकुल रखडले…योजनेचा फायदा काय…?

bol maharashtra

आर्णीत काँग्रेसचे नालंदा भरणे नगरादयक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची मुसंडी,शिवसेना ४ तर शिवसेना उबाठा १ व भाजप ने खाते खोलले…!

bol maharashtra

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्राताईंनी केली भावूक पोस्ट,स्व.दादांची शिकवण हेच बळ..!

bol maharashtra