Bol Maharashtra
ब्रेकिंग

“शेतकरी कर्जमाफीच्या लढ्याला प्रहार संघटनेचा जाहीर पाठिंबा”

**सह संपादक / विश्वनाथ शिंदे**

**पंढरपूर :** शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला प्रहार संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत संघटनेचे कार्याध्यक्ष **महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ** यांनी अधिकृत पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रहार संघटनेने दिलेल्या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला असून अतिवृष्टी, दुष्काळ, उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावातील घसरण आणि वाढते कर्जबाजारीपण यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून त्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे.

संघटनेने स्पष्ट केले की, शेतकऱ्यांचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि अन्नदात्यांच्या जगण्याशी निगडित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जो कोणी लढा उभा करेल, त्याला पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे.

यावेळी प्रहार संघटनेने आमदार बच्चू कडू यांच्यावर रोहित पवार उपोषण करत असलेल्या स्टेजवरून करण्यात येणाऱ्या वैयक्तिक टीकेचाही निषेध नोंदविला. शेतकरी, दिव्यांग, मजूर आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नेतृत्वावर अशा प्रकारच्या टीका करणे योग्य नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.

पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा प्रभावीपणे मांडावा आणि शासनापर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवावा, अशी अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र व्हावा, अशी भूमिका प्रहार संघटनेने व्यक्त केली आहे.

शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला योग्य भाव आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी प्रतिनिधींचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related posts

“नियम कागदावरच,शहर कचऱ्यात!” – ई-रिक्षा चालक व सफाई कर्मचारी गैरहजर;नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

bol maharashtra

सरसकट कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर आक्रमक; १५ जूनपासून बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

bol maharashtra

नव्या कर निर्धारणास नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेविका प्रीतीताई शिवरामवार यांचा तीव्र विरोध…!

bol maharashtra