Bol Maharashtra
निवडणूक ब्रेकिंग सामाजिक

अरुणावती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र शिवरामवार यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड…!

आर्णी शहराला लागून जीवन वाहिनी अरुणावती नदी वाहते.

अरुणावती नदी च्या नावाने सुमारे २५ वर्षा पूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद शिक्षक असलेल्या राजेंद्र शिवरामवार यांनी आपल्या काही निवडक सहकारी मित्रांना घेऊन नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली तेव्हा खरतड वस्तनारा प्रवास अतिशय पारदर्शक व विश्वासाने आज हजारो ठेवीदार व दैनिक बचत करणाऱ्या व्यवससीक व जमा करणाऱ्या बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे

शेकडो बेरोजगार व व्यापारी बांधवांना अर्थ सहायता करून आज मोठ्या दिमाखात ही पत संस्था कार्यरत आहे.

या वर्षी अरुणावती नागरी पतसंस्था चे रौप्य महोत्सवि वर्ष आहे.अशा वेळी आर्णी नगरपरिषद चे शिल्पकार ज्यांनी सतत पाठपुरावा केला. आंदोलन केले   ते पतसंस्था संस्थापक  राजेंद्र शिवरामवार यांची पतसंस्था मधून यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेच्या साठी बँक  प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड करण्यात आली.

अरूनावती नागरी सहकारी पतसंस्था सन २००० मध्ये नोंदणीकृत झाली,२५० सदस्य संख्ये वरून आज १५००भागधारक सभासद संस्थेशी निगडित आहे.
आजपर्यंत सर्व संचालक मंडळ अविरोध निवडून आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश चिल्लरवार, सचिव श्री आनंद व्यवहारे ह्यांच्या नेतृत्वात संस्था
उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.
संस्थापक अध्यक्ष श्री राजेन्द्र शिवरामवार ह्यांची संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात बँक प्रतिनिधी म्हणुन झालेली निवड भूषणावह  ठरत आहे.

Related posts

मराठा सेवा संघाने समाजाला वैचारीक शिवजयंती दिली – आ.अभिजित पाटील

bol maharashtra

अरुंद रस्ता, बेकायदेशीर लाईट्स; मुक्रामबाद मार्ग नागरिकांसाठी धोक्याचा

bol maharashtra

रुग्ण सेवेला समर्पित चंदन राठोड…! नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, लाभ घेण्याचे आवाहन…!

bol maharashtra