Bol Maharashtra
गुन्हा

दुचाकी चोर केला आर्णी पोलिसांनी जेरबंद,६ चोरीच्या दुचाकी चा लावला छडा…!

दुचाकी चोरी चा तातडीने छडा लावत आरोपींना आर्णी पोलिसांनी  जेरबंद करण्याची स्तुत्य कामगिरी केली.

शहरातील एका लॉज समोरून एका फिर्यादी ची दुचाकी चोरीस गेली होती.त्याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.तांत्रिक माहिती व गोपनीय माहिती च्या आधारे सचिन संदीप सुकळकर उर्फ आकाश(३२) लाख रायाजी यास शिताफीने अटक केली त्यास पोलिसी खाक्या दसखवताच त्याने आणखी ६ दुचसकी चोरी ची कबुली दिली

 

आरोपी सराईत चोर असून त्याने यवतमाळ व घाटंजी येथून देखील दुचाकी चोरीची कबुली दिली. त्या चोरीच्या ६ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.१ लाख ८० हजाराचा ऐवज आर्णी पोलिसांनी जप्त केल्या.ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता  अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात आर्णी चे ठाणेदार निलेश सुरडकर, सहायक पोलीस निरीक्षक. मिलिंद पारडकर,प्रशांत देशमुख,गुणवंत बोईनवाड, नितीन वास्टर,मनोज चव्हाण, आकाश गावंडे,आसिफ खल्लीखाऊ व आकाश पातुरकर इत्यादि टीम ने ही मोलाची कामगिरी बजावली.

 

Related posts

शिक्रापूर(पुणे): शिक्रापुरात चोरांचा सुळसुळाट घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास…!

bol maharashtra

गोव्यात आगीत होरपळून २५ ठार ५० जखमी,नाईट बार मधील दुर्दैवी घटना..!

bol maharashtra

आर्णी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला…!

bol maharashtra