Bol Maharashtra
गुन्हा राष्ट्रीय

गोव्यात आगीत होरपळून २५ ठार ५० जखमी,नाईट बार मधील दुर्दैवी घटना..!

देशात पर्यटनासाठी पसंत केल्या जाणाऱ्या गोवा या छोट्या शहरात मोठया प्रमाणात पब बार खुली स्वस्त दारू बिअर मिळण्यासाठी गोवा प्रसिद्ध आहे देशातील व विदेशातील पर्यटक येथे येतात त्यामुळे येथे समुद्र किनारी हॉटेल व्यवसाय मोठया प्रमाणावर आहे.जसे गोवा उंच उंच नारळाच्या झाडा साठी प्रसिद्ध आहे तसेच येथे सी फूड सागरी मासे देखील मोठया प्रमाणावर मिळते.सोबत आंबट शौकिनासाठी अधिकृत व अनधिकृत डान्स बार व नाईट क्लब देखील चालवल्या जातात
अशाच एका नाईट क्लब मध्ये गीतांचा कार्यक्रम सुरू असताना आग लागली पहाता पहाता सर्व क्लब आगीत स्वाहा जळून खाक झाला या घटने नंतर एकच धावपळ झाली लोक जीव वाचवण्यासाठी पळाले पण सुमारे २५ लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर या दुर्दैवी घटनेत ५० जण गंभीर भाजले.
गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये शनिवार-रविवारच्या मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी सव्वानऊच्या सुमारास केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

त्यापूर्वी पहाटे घटनास्थळी भेटीनंतर सावंत यांनीच 23 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. त्यात नंतर वाढ झाली.

सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा पोलिसांना संशय आहे.

मृतांपैकी बहुतेक जण या क्लबचेच कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे.

नॉर्थ गोव्यातील अर्पोरा भागात असलेल्या क्लबमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये काही पर्यटकांचाही समावेश आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, मृतांपैकी बहुतेक जण नाईट क्लबमधील स्वयंपाकघरात काम करणारे कर्मचारीच होते.

यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

पंतप्रधान मोदींकडून या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात आलं असून मदतीचीही घोषणा करण्यात आली आहे

Related posts

सहा महिने अनेकांना मूर्ख बनवणारी तोतया महिला आय ए एस..!

bol maharashtra

पुलाच्या निर्मितीसाठी ना.गडकरींना जेवणाचे निमंत्रण…युवकाची अनोखी शक्कल…!

bol maharashtra

बांग्लादेशात हिंदू नरसंहार,सकल हिंदू आर्णी च्या रस्त्यावर…!

bol maharashtra