Bol Maharashtra
महाराष्ट्र राजकारण

विरोधी पक्ष नेत्या विना अधिवेशन…!

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे गुलाबी थंडीत होणारे हे अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्ती वरून तापले आहे.२८८ संख्या बळात किमान १०% संख्या विरोधक असायला हवा हा मुद्दा सत्ता धारी पक्ष पुढे करत आहे पण त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख आमदार उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर सरकारला घेतले.
सत्ताधारी पक्षाने ठेवलेल्या चहा पानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला व सरकार चे कृत्य म्हणजे लोकशाही ची हत्या असल्याचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, आमदार विजय वड्डेटीवार यांनी सरकारला लोकशाही मान्य नाही अशी टीका केली.
सभागृहात पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कंपनी अडिया चा जमीन गैरव्यवहार मंत्री संजय शिरसाठ यांनी दिलेली जमीन घेतलेले हॉटेल असे अनेक मुद्दे उपस्थित होऊ शकणार आहे जरी संख्याबळ ४९ असले तरी सभागृह तापणार हे मात्र नक्की..!
महा विकास आघाडी च्या कोणत्याही पक्षा कडे १०% आमदार संख्या नाही

भाजपा- १३२

शिवसेना (शिंदे गट)- ५७

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- ४१

काँग्रेस- १६

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- १०

शिवसेना (ठाकरे गट)- २०

समाजवादी पार्टी- २

जन सुराज्य शक्ती- २

राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- १

राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- १

एमआयएम- १ जागा

सीपीआय (एम)- १

Related posts

निताताई राजेश आडे यांचा विजयाचा श्रीगणेशा..बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड….!

bol maharashtra

आर्णी येथे पार पडले काँग्रेस पक्षाचे ‘सृजन संघटन अभियान’

bol maharashtra

आर्णी चे वऱ्हाडी कवी बिब्बाकार विजय ढाले सातारा येथील ९९ व्या अ.भा. साहित्य संमेलनात होणार सहभागी

bol maharashtra