Bol Maharashtra
निवडणूक राजकारण

पक्ष प्रवेशाच्या खेळीने भाजप मधील नाराजी नाट्य शमणार…?

आर्णी तालुक्यातील जवळा -लोणी जिल्हापरिषद गटा तील निवडणुकी पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत हाय होलटेज नाराजी नाट्य पहायला मिळाले.
गेल्या सुमारे एक वर्षा पासून या मतदारसंघात मुंबईत नोकरीस असलेले खेड बीड चे भूमिपुत्र कामगार उपायुक्त राजेश आडे यांच्या धर्मपत्नी सौ.नीताताई राजेश आडे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सूर केली आहे.विविध सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम राबवून त्यांनी लक्षवेधी काम सुरू केले होते.
पण निवडणूक जवळ आली तशी येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एक बैठक घेत नवा जुना वाद पुढे आणला होता.
त्यामुळे निताताई यांच्या उमेदवारीला गतिरोध निर्माण होईल असे चित्र होते.
मात्र जरी राजेश आडे नोकरी निमित्ताने बाहेर रहात असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ घट्ट आहे.
दरवर्षी नियमित ते खेड ते माहूर पद यात्रा दिंडी काढत त्यात स्वतः सहभागी होतात.या दिंडीतून ते युवकांना व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण व विविध सामाजिक प्रबोधन करत असतात.
सामाजिक कार्याची प्रेरणा निता ताई यांना पती राजेश आडे यांच्या कडूनच मिळाली असून “गणपती ट्रस्ट” च्या माध्यमातून त्यांनी या भागात गरजू गरीब रुग्णांना सेवा मिळावी म्हणून रुग्णवाहिका सुरू केली.
अनाथ मुलांच्या लग्ना साठी ते वेळोवेळी मदत करत असतात.
राजेश आडे हे लोकांना सतत मदत करत असतात. अधिकारी असल्याने विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती आहे
पण पक्षात उमेदवारी वरून निर्माण झालेल्या पेचावर आता त्यांनी नामी व जालीम उपाय शोधला असून
आर्णी येथे भारतीय जनता पक्षाच्या दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात निता ताई राजेश आडे यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.
आता मात्र त्यांच्या उमेदवारी चा मार्ग प्रशस्त झाला आहे.
भारतीय जनता पक्ष धक्का तंत्र वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे.मग गुजरात असो की देशात कुठेही की यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड मतदारसंघात असो की आर्णी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी कधी कोणते निकष लावेल सांगता येत नाही. आमदार प्रा.राजू तोडसाम व। यवतमाळ भाजप जिल्हादयक्ष यांच्या उपस्थितीत निताताई राजेश आडे यांचा पक्ष प्रवेश झाल्याने आता त्यांच्या उमेदवातिला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Related posts

किरीट सोमय्या यांच्या त्या दौऱ्याने आर्णीत विविध चर्चेला पेव…!

bol maharashtra

आर्णीत धडकनार एम आय एम चे वादळ,राजकीय समीकरणात होणार मोठे बदल,युसूफ पुंजानी यांचा दौरा..!

bol maharashtra

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech