Bol Maharashtra
निवडणूक

अमरावती:महानगरपालिका महापौर भाजपचाच, पण केंद्रस्थानी युवा स्वाभिमान ?

 

पंकज काकडे
अमरावती:महानगरपालिका महापौर भाजपचाच, पण केंद्रस्थानी युवा स्वाभिमान ?

मनपा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 25 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान निर्माण केले असले तरी त्यांना स्पष्ट बहुमत नसल्यामुळे. थेट सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे. बहुमतासाठी भाजप आघाडीवर असले तरी, युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा सत्ता स्थापनेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या १५ सदस्यांच्या पाठिंब्याने महापालिकेत भाजपचा भगवा फडकण्याची शक्यता आहे. महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गसाठी जाहीर झाले असून, त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे आमदार राणा यांचा पत्नी व भाजपच्या नेत्या
नवनीत राणांमुळे नुकसान झाल्याचा आरोप करत, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करणारी चिठ्ठी भाजपच्या पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली आहे. या पत्राची दखल घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाईची तयारी सुरू केली आहे. लवकरच या संदर्भात कारवाई केली जाईल आणि वरिष्ठ नेत्यांची एक टीम अमरावतीला भेट देणार आहे, अशी माहिती अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Related posts

महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल उद्या वाजणार…!

bol maharashtra

त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान,पुंजानी यांची याचिका उद्याच सुनावणी…!

bol maharashtra

महायुती साठी प्रयत्न,जनादेशा चा आदर व्हावा ही आर्णी च्या नागरिकांची इच्छा:सुनील पोदगंटवार

bol maharashtra