Bol Maharashtra
धर्म - कर्म

गड कोट मोहिमेसाठी आर्णी तालुक्यातील १०० धारकरी रवाना..!

आर्णी विभागातून १०० धारकरी मोहिमेसाठी रवाना

दिनांक २२ जानेवारी रोजी आर्णी विभागातील १००+ धारकरी लोहगड ते राजमाची गड होणाऱ्या धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी रवाना झाले यावेळी शहरातील अनेक नागरिकांनी त्यांचा सत्कार केला, व शहरातील शिवनेरी चौक या ठिकाणी शिवरायांचा प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले व प्रवासाला सुरुवात झाली, मोहिमेला जाणाऱ्या सर्व धारकऱ्यांचे मोहिमेला निघताना औक्षण झाले आणि धारातीर्थ गडकोट मोहिमेची सुरुवात झाली.

गेल्या ५ वर्षांपासून आर्णी विभागातून धारकरी मोहिमेसाठी जात आहे पहिल्या वर्षी १ दुसऱ्या वर्षी २ तिसऱ्या वर्षी ८ चौथ्या वर्षी ४० तर यावर्षी मोहिमेसाठी आर्णी विभागातील १०० पेक्षा अधिक धारकरी जात असून तालुक्यातील वरूड मधून ४० तर जवळा, सुकळी, तळणी, विठोली, चिखली सह अनेक गावातील धारकरी मोहिमेसाठी रवाना झाले.
सर्व धारकऱ्यांना मोहिमेला पाठविण्यासाठी शहरातील अनेक हिंदू बांधव शिवनेरी चौकात उपस्थित होते.

Related posts

भक्तीरसात आर्णी न्हाहून निघणार,भक्तांच्या गर्दी चा होणार नवा इतिहास आयोजन समिती,प्रशासन सज्ज,पंडित मिश्रा यांच्या अमृतवानीतून ३० मार्च पासून शिवपुरान कथेला सुरवात

bol maharashtra

सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजन

bol maharashtra

शिव व्याख्याते सचिन दादा पाटील यांचे शिवचरित्रावर धगधगते विचार आर्णीकर नागरिकांना ऐकायला मिळणार…!

bol maharashtra