परवेज बेग यांच्या निवेदनाची दखल आर्णीतील अरुणावती नदीपूलावरील कठडे बसविण्यात प्रारंभ
———————
आर्णी ता,23 जानेवारी….सामाजिक कार्यकर्ते यांच्या निवेदनाची दखल उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग आर्णी यांनी घेतली असून अरुणावती नदीपूलावरील लोखंडी कठडे बसविण्यास प्रारंभ झाला आहे,
अरूणावती नदीला पूर आल्याने पूरामूळे अरुणावती नदीपूलावरील लोखंडी कठडे वाहून गेली होती तेव्हा पासून लोखंडी कठडे वाहून गेल्याने याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग आर्णी दूर्लेक्ष करित होते या गंभीर बाबीकडे सामाजिक कार्यकर्ते परवेज बेग मिर्झा यांनी लक्ष देवून ता,19 जानेवारीला उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग आर्णी यांना निवेदन देवून येत्या पांच फेब्रूरवारी पासून सर्वधर्मीयाचे श्रध्दास्थळ बाबा कम्बलपोष याञेचा प्रारंभ होत असून तसेच या अरुणावती पूलावरुन दूचाकीस्वार,वाहन धारक,तसेच ग्रामीण भागासह शहराची मोठी रहदारी राहते अरुणावती नदीपूलावर सूरक्षा नसल्याने मोठी जीवतहानी होऊ शकते,व उर्स याञेची पूढील होणारी भाविक भक्ताची गर्दी लक्षात घेता अरुणावती नदीपूला वरील लोखंडी कठडे तात्काळ बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते परवेज बेग मिर्झा यांनी
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग आर्णी यांना निवेदना व्दारे केली होती परवेज बेग यांच्या निवेदनाची दखल म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग आर्णी यांनी घेतली असून अरुणावती नदीपूलावरील लोखंडी कठडे बसविण्यात प्रारंभ झाल्याने परवेज बेग यांचे सर्वस्तरावरुन कौतूक होत आहे
