Bol Maharashtra
सामाजिक

अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहासाठी १ कोटी ६९ लाखांचा निधी, माजी आमदार ख्वाजा बेग यांचा सत्कार

अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहासाठी १ कोटी ६९ लाखांचा निधी

माजी आमदार ख्वाजा बेग यांचा सत्कार

प्रतिनिधी आर्णी:

यवतमाळ येथील अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या वसतिगृहाच्या प्रलंबित दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करून १ कोटी ६९ लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने माजी आमदार ख्वाजा बेग यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी वसतिगृहाच्या दुरुस्तीची अत्यंत गरज होती. ही बाब लक्षात घेऊन ख्वाजा बेग यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच मोठा निधी प्राप्त झाला असून, आता वसतिगृह सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कार्याची दखल घेत कर्मचारी संघटनेने कृतज्ञता व्यक्त केली.
या सत्कारा वेळी संघटनेचे विदर्भ प्रमुख शेरु कदीर सैय्यद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी नदीम नसीम पटेल, गुलमोहमद फानन, अलिमहमद भाटी,
के. के. खान , लुकमानबेग मिर्झा, नासिर अली भाटी, शमशोद्दीन भाटी, अफरोज दुगे,
आंबेडकरी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रशांत वंजारे यांची विशेष उपस्थिती होती. माजी आमदार ख्वाजा बेग हे “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचावी म्हणून सातत्याने प्रयत्नशील असतात. अशी भावना संघटनेच्या पदाधिकारी मंडळींनी व्यक्त केली.
यापुढेही सर्व घटकातील जनतेसाठी रचनात्मक विकास व कामांसाठी कटिबद्ध राहू,” अशी भावना ख्वाजा बेग यांनी व्यक्त केली. शिक्षणाविषयी असणाऱ्या ख्वाजा बेग यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related posts

सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..!

bol maharashtra

सुनील पोतगंटवार १६ वर्षा पासून करत आहेत जलसेवा,सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक..!

bol maharashtra

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समिती गठीत

bol maharashtra