Bol Maharashtra
सामाजिक

पर्यावरण रक्षणासाठी परसोडा ग्रामपंचायत एक पाऊल पुढे, प्लास्टिक बंदी चा निर्णय..!

*परसोडा ग्रामपंचायत द्वारा प्लास्टिक बंदी चा अभिनव उपक्रम.*
*अंजली ड्रेसेस द्वारे ग्रामस्थांना कापडी पिशवी चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उपस्थित वाटप.*
आर्णी :मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत परसोडा ग्रामपंचायत मध्ये प्लास्टिक बंदी चा ठराव घेण्यात आला त्याचे अंमलबजावणी चा भाग म्हणून अंजली ड्रेसेस च्या वतीने ग्रामस्थांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे ह्यांचे हस्ते वअंजली ड्रेसेसचे संचालक राजेश श्रीवास यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये कापडी पिशवी चे वाटप करण्यात आले.
गावातून प्लास्टिक हद्दपार करणे करिता परसोडा ग्रामपंचायत द्वारे प्लास्टिक बंदीचा ठराव घेण्यात आला होता त्याची योग्य अशी अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने अंजली ड्रेसेस चे संचालक राजेश श्रीवास यांनी ग्रामस्थांना कापडी पिशवी चे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषद चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे ह्यांचे हस्ते परसोडा ग्रामपंचायतचे कार्यालयात कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. ह्यावेळी गटविकास अधिकारी रमेश खारोडे, बघेल विस्तार अधिकारी, ठाकरे विस्तार अधिकारी, जय राठोड मनरेगा कार्यक्रम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती तर माजी सरपंच अतुल पाटील देशमुख, अरुण देशमुख,बाबाराव वानखडे मुख्याध्यापक, नारायण वेट्टी साहाय्य शिक्षक, ज्ञानेश्वर मिसाळ, शंकर कोल्हे, गजानन शेळके, पंकज राठोड, स्वप्नील रोहिदास राठोड, कुंदन पवार,कैलास जाधव,अमोल कोल्हे,दादाराव पारधी, भगवान पोटे, रामकृष्ण ढोके, प्रविण राठोड, राहुल तुवर, रोहिदास तुवर, पुष्पा जाधव, चंदा जाधव यांची उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमाचे संचलन ग्राम विकास अधिकारी दिग्विजय मुंडवाईक यांनी केले.

Related posts

आर्णी महापुरान कथे दरम्यान मुस्लीम समाजाने जपला धार्मिक सदभाव…!

bol maharashtra

‘अनाथांचा नाथ एकनाथ’ याची प्रचिती संकटात असणाऱ्या राज्यातील लोकांना आला: पराग पिंगळे

bol maharashtra

प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाला गुरुदेवने धरले धारेवर

bol maharashtra