Bol Maharashtra
बिना केटेगरी

कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. मनीषा गडदे यांना समाज भूषण पुरस्कार जाहिर,,

प्रतिनिधि 🖋️ संदिप ढाकुलकर

“कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. मनीषा गडदे यांना समाज भूषण पुरस्कार जाहिर,,

अहिल्यनगर : माऊली संकुल सभागृहअहिल्यानगर येथे नुकताच स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान सोहळा संपन्न झाला या वेळी
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निलेश कुमार पावसे, श्रीमहंत डॉ.श्रीकांतदास धुमाळ उज्जैन महाकाल, डॉ.सुधा कांकरिया,डॉक्टर शंकर अंदानी, सिनेतारका रुचिरा देसाई, महाराष्ट्रातील सर्व सरपंच ग्रामपंचायत शिक्रापूर सन्माननीय सदस्य त्रिनयन कळमकर,प्रकाश वाबळे या वेळी उपस्थित होते
गावामध्ये व परिसरामध्ये कर्तव्य फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमामध्ये प्रामुख्याने केलेली कामे आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वाटप,वह्यावाटप, वृक्ष लागवड, स्वच्छता मोहीम,बचत गटांना ट्रेनिंग अनाथ आश्रम शाळेला मदत,दिव्यांगांना मदत, ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळ वाटप,सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे, सालाबाद प्रमाणे एक जानेवारी येथे आलेल्या भीम अनुयायांना अल्पोहार,चहा,पाणी वाटप इत्यादी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कामाबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय महिला समाज भूषण पुरस्काराने सौ मनीषा गडदे यांना सन्मानित करण्यात आले
कर्तव्य फाउंडेशन अध्यक्षा सौ. मनीषा रमेश गडदे, अंकुश घारे, आदर्श ग्रंथपाल संतोष काळे ,पत्रकार राजाभाऊ गायकवाड,महेश शिर्के, पत्रकार उदय ब्राह्मणे पत्रकार निलेश जगताप ,भरत खोले संकेत गडदे ,हार्दिक गडदे, सौ, मेघा तांबे, सौ वंदनाताई रामगुडे,सौ वैशाली गायकवाड. सौ. कल्याणी गडदे , सौ. सीमा कळमकर इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते.त्यांच्या या पुरस्काराबद्दल शिक्रापूर ग्रामस्थांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे

Related posts

भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध:आ. बाळासाहेब मांगुळकर

bol maharashtra

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

bol maharashtra