Bol Maharashtra
सामाजिक

भानसरा प्रा.शाळा व्यवस्थापन समितीच्या अद्यक्षपदि निलेश पावसे…!

 

भानसरा येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना

अध्यक्षपदी निलेश पावसे

तालुक्यातील भानसरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील सर्व पालकांची सभा नुकतीच संपन्न झाली. सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून निलेश पावसे तर उपाध्यक्षपदी नितीन शेंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार स्थापन करण्यात आलेली ही समिती पालक, शिक्षक, स्थानिक प्रतिनिधी आणि विद्यार्थी यांचा समावेश असलेली समिती असून शाळेच्या व्यवस्थापनात लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि शाळेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी काम करते. या समितीमध्ये बहुतांश सदस्य पालक असतात आणि ती शाळेच्या विकासाचे नियोजन करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडत असते त्यामुळे गावपातळीवर या समितीला महत्त्वाचे स्थान असते. समितीमध्ये मारोती गेडाम, करूणा गेडाम, चंदा धुर्वे, दुर्गा गेडाम, गजानन कुरसंगे, प्रभाकर नैताम, प्रतिभा भगत, देवेंद्र कांबळे, अनिल सिंगनजुडे, प्रगती मोहळे, प्रफुल गायकवाड, समता कांबळे, दर्शन गेडाम, पल्लवी पोकळे आदींचा समावेश करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पी. एस. वंजारे, विजय मोहळे, निलिमा मंगाम, अर्चना उईके, नामदेव कनाके, लता गेडाम, कविता शेडमाके आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य करण्याचे कबूल केले.

Related posts

अरुणावती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र शिवरामवार यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड…!

bol maharashtra

पद नसतांना जनसेवेत तत्पर असणारा जनतेच्या मनातील नगरसेवक…!

bol maharashtra

‘अनाथांचा नाथ एकनाथ’ याची प्रचिती संकटात असणाऱ्या राज्यातील लोकांना आला: पराग पिंगळे

bol maharashtra