नुकतीच आर्णी नगरपरिषद ची सार्वत्रिक निवडणूक झाली.या निवडणुकीत पक्ष पैसा जात धर्म महत्वाचा ठरला.
नगरपरिषद निवडणूक दर पाच वर्षांनी होते पण यावेळी ती ९ वर्षानी झाली ४ वर्ष प्रशासक राज होते.या कालावधीत लोकांच्या समस्ये कडे अनेकांनी पाठ फिरवली होती तेव्हा परवेज बेग नावाचा युवक सतत लोकांच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरला त्याने लोकांच्या मनात जागा मिळवली.एक कॉल प्रॉब्लेम सोल्व्ह अशी त्याची ओळख निर्माण झाली.
जनतेच्या मनातील नगरसेवक परवेज बेग मिर्झा
शहरातील सामाजिक,
आरोग्य व स्वच्छता विषयक कामांमध्ये नेहमीच आघाडीवर असणारे, सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे लोकप्रिय युवक परवेज बेग मिर्झा हे नाव आज आर्णी शहरात आदराने घेतले जाते. जरी ते आर्णी नगरपरिषद निवडणुकीपासून दूर राहिले असले, तरी प्रत्यक्षात ते जनतेच्या मनातील खरे नगरसेवक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आर्णी नगरपरिषदेच्या निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या.
निवडणुकीनंतर अनेक नगरसेवक निवडून आले, मात्र निवडणुकीच्या गदारोळापासून कोसो दूर राहूनही परवेज बेग मिर्झा यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. निवडणूक असो वा नसो, जनसेवेचा ध्यास त्यांनी कधीही सोडलेला नाही. शहरातील आरोग्य विषयक समस्या, अस्वच्छतेचे प्रश्न, कचरा व्यवस्थापन, नाले साफसफाई, रस्त्यांवरील घाणीचे ढीग, डासांचा प्रादुर्भाव अशा अनेक बाबींवर परवेज बेग मिर्झा हे स्वतः लक्ष घालताना दिसतात. एका फोन कॉलवर त्वरित दखल घेऊन संबंधित स्वच्छतादूत, कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आर्णीतील नागरिकांमध्ये परवेज बेग मिर्झा यांच्याविषयी विशेष आपुलकी व विश्वास आहे. कोणतीही समस्या असली तरी “परवेज बेग आहेत ना” असे म्हणून नागरिक निर्धास्त होतात, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती मानली जात आहे…
