Bol Maharashtra
Last 24 Hour सामाजिक

आर्णी पंचायत समिती येथे पैसा दिन साजरा…!

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या निर्देशा नुसार यवतमाळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनात आर्णी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रमेश खारोडे याच्या प्रमुख उपस्थितीत पैसा दिना चे आयोजन करण्यात आले होते.

पैसा कायद्याचे अंतर्गत अनुसूचित जमाती च्या प्रवर्गातील नागरिकांना न्याय हक्क मिळावे त्यांच्या मूलभूत गरजा, सामाजिक राजकिय उत्कर्ष ह्या दृष्टीने पैसा कायद्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे.

२४ डिसेंम्बर २०२५ ला या कायद्याला २९ वर्ष पूर्ण झाले तेव्हा पासून हा दिवस पैसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या वर्षी देखील पेसा दिन आर्णी पंचायत समिती मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी रमेश खोरोळे,पेसा तालुका व्यवस्थापक मनीषा खंडाळकर,पंचायत विस्तार अधिकारी इंगोले,ग्राम सेवक वड्डे, सहायक गटविकास अधिकारी पंडे, विस्तार अधिकारी माकोडे, मनोज टाकूर,दुर्गा टाकरस, प्रदीप मेश्राम,मकोडे,जयश्री चोपडे आदी उपस्थित होते.

 

Related posts

पुलाच्या निर्मितीसाठी ना.गडकरींना जेवणाचे निमंत्रण…युवकाची अनोखी शक्कल…!

bol maharashtra

स्मार्ट मिटर व थकीत वीजबिलासाठी आर्णी विजविरण ची जागृती मोहीम…!

bol maharashtra

अखिल भारतीय उद्योग व्यापार मंडल सिद्धार्थनगर ने किया पुलिस का सम्मान ,अंगवस्त्र मय पुष्प गुच्छ किया भेंट

Web1Tech