Bol Maharashtra
निवडणूक

पोलिस बंदोबस्तात शिक्रापूर उपसरपंच पदाची निवडणूक उपसरपंच पदी त्रिनयन कळमकर विजयी..!

 

प्रतिनिधि 🖋️ संदिप ढाकुलकर 17/1/26

पोलिस बंदोबस्तात शिक्रापूर उपसरपंच पदाची निवडणूक
उपसरपंच पदी त्रिनयन कळमकर विजयी..!

शिक्रापूर (पुणे) शिक्रापूर येथील उपसरपंच सौ. वंदना भुजबळ यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदावर उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती. या अटीतटीच्या निवडणुकीत त्रिनयन कळमकर यांना दहा मते मिळत अवघ्या चार मतांनी निसटता विजय मिळाला. विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्राम विकास अधिकारी यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक घेण्यात आली होती. या वेळी आदर्श सरपंच रमेश गडदे मावळत्या उपसरपंच वंदना भुजबळ, ग्राम पंचायत सदस्य मयुर करंजे, ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा दीपक भुजबळ, सारिका सासवडे, मोहिनी युवराज मांढरे, कृष्णा सासवडे, त्रिनयन कळमकर, शालन राऊत, प्रकाश वाबळे, विशाल खरपुडे, कविता टेमगिरे , सीमा लांडे, मोहिनी संतोष मांढरे, सुभाष खैरे, उपस्थित होते. या वेळी उपसरपंच पदासाठी प्रकाश वाबळे आणि त्रिनयन कळमकर यांनी अर्ज दाखल केले होते त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये कळमकर यांना दहा मते मिळत अवघ्या चार मतांनी विजय झाल्याचे ग्रामविकास अधिकारी श्री शिवाजी शिंदे यांनी जाहीर केले. या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच त्रिनयन कळमकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना गावातील समस्यावर आणि युवा वर्ग साठी काम करू असे वक्तव्य केले

Related posts

वर्षाताई वसंतराव शिंदे बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध…!

bol maharashtra

आर्णी च्या प्रचार सभेत ना.संजय भाऊ राठोड यांची तुफान फटकेबाजी..!

bol maharashtra

पद नसतांना जनसेवेत तत्पर असणारा जनतेच्या मनातील नगरसेवक…!

bol maharashtra