Bol Maharashtra
खेळ

चला खेळूया..बुद्धीबळ स्पर्धेत श्रावस्ती शेंद्रेची जिल्हास्तारावर निवड….

बुद्धीबळ स्पर्धेत श्रावस्ती शेंद्रेची जिल्हास्तारावर निवड….
आर्णी :-
चला खेळूया यवतमाळ जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा प्रशासन यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने ता २० व २१ जानेवारी २६ ला स्थानिक महंत दत्तराम भारती विद्यालयामध्ये करण्यात आले होते. भविष्यातील चॅम्पियन घडवणारे अभियान असुन ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये एँथेलेटिक्स, बुद्धीबळ, व्हालीबॉल, कुस्ती, तीरंदाजी, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो, बॅटमींटन या खेळांचा सहभाग घेतला होता.१७ वर्षे आतील वयातील गट २ मध्ये आर्णी, यवतमाळ, दारव्हा, नेर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये आर्णी येथील मातोश्री शांताबाई तु चव्हाण विद्यालय आर्णी येथील नवव्या वर्गातील विद्यार्थींनी कु श्रावस्ती अरूण शेंद्रे हिची बुद्धीबळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. ती मुळ दाभडी ता.आर्णी येथील विद्यार्थ्यांनी असुन तीचे सार्वत्रिक कौतुक होत आहे.
बुद्धीबळ स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल कु श्रावस्ती शेंद्रेची शाळेचे अध्यक्ष डॉ पंडितराव चव्हाण,संस्थेचे व्यवस्थापक उल्हास चव्हाण, मुख्याध्यापक मंगेश ब्रम्हकार, शिक्षक सचिन शिंदे, किशोर लाखकर, आशिष मोरे, कु दिपमाला कावळे, राहूल चव्हाण, मयुरी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (बातमी सोबत फोटो घेणे )

Related posts

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech

खेळाडूंसाठी जयहिंद मंडळाची भूमिका कौतुकास्पद:ना.संजय भाऊ राठोड

bol maharashtra

सुमार गोलंदाजीमुळे गमावला सामना,भारत आफ्रिका १-१ बरोबरीत…!

bol maharashtra