Bol Maharashtra
सामाजिक

पंचायत समिती सदस्यांना विधानपरिषदेत मतदानाचा हक्क व विकास निधी द्यावा:विजयसिंह राठोड

 

जि.प.सदस्याप्रमाणे पं. स. सदस्यांना राखीव विकास निधी व विधान परीषदेचा मतदार बनविणे व मतदानाचा हक्क देण्यासाठी आर्णी येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व भारतीय जनता युवा मोर्चा चे माजी जिल्हा सचिव विजयसिंह राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करत मागणी केली आहे.

 

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प.स. गणातुन १५ त २० गावे सांभाळावी लागतात प.स. गणातुन निवडुन दिलेल्या पं. स. सदस्याकडुन विकास कामाची नागरीक अपेक्षा करतात परंतु त्या भंग होतात. त्यामुळे लोकांनी निवडुन दिलेल्या सदस्यावर व त्या पक्षावर तिव्र नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे आपणास नम्र विनंती की पं. स. सदस्यांना वार्षीक ५० लक्ष रू निधी देण्याची तरतुद करून प.स. गणाला व सदस्याला न्याय दयावा.

अतिमहत्वाचे म्हणजे जि.प. सदस्य, व प.स.सभापती व नगरसेवक हे स्थानीक स्वराज्य संस्थेचे मतदार असतात व ते विधान परीषदेच्या उमेदवाराला मतदान करतात. तर मग प.स.सदस्य जे १५ ते २० गावातुन निवडुन येऊन १५ त २० गावाचे नेतृत्व करतो. तो सुध्दा लोकप्रतिनीधी असुन त्यालाही जि.प. सदस्य, नगर सेवक, व प.स. सभापती प्रमाणे मतदार म्हणुन नोंद करावी  ही विनंती करण्यात आली आहे.

Related posts

आर्णीकरांना आता ‘बिबट्या’चे भय,तरुणावर झडप,सुदैवाने जीव वाचला..!

bol maharashtra

सुनेत्राताई पवार होणार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस ची धुरा देखील सांभाळणार…!

bol maharashtra

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी:कृष्णा पुसनाके,शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

bol maharashtra