Bol Maharashtra
सामाजिक

महापरिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन..

महापरिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन..
आर्णी :-
शहरातील स्व उत्तमराव देशमुख इंग्लिश मिडियम स्कुल व मातोश्री शांताबाई तु चव्हाण विद्यालय आर्णी येथे ता ६ डिसेंबर रोज शनिवारला सकाळी ८ वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ पंडितराव चव्हाण तर मुख्याध्यापक पंकज ठाकरे,मंगेश ब्रम्हकार,कोमल चव्हाण, व्यवस्थापक उल्हास चव्हाण, पर्यवेक्षक आशिष मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थितांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी शिक्षक आशिष मोरे व अनिल गेडाम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकतांना त्यांच्या जीवनकार्याची, समाजवादी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातील दुर्मिळ रत्न होऊन गेले त्यांच्या महापरिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक सचिन शिंदे, अनिल गेडाम, साजिद शेख, किशोर लाखकर, सुकेष्णा बन्सोड, निकिता दहिकर, स्वाती ढोरे, राहुल चव्हाण, प्रीति अंदूरे, शुभांगी शिंदे, पुजा बोंपिलवार, सुनिता जाधव, वैश्नवी इंगळे, हर्षदा राऊत, अंबिका हेडस्कर, दिपमाला कावळे, जया गौरखेडे, प्रगती दिवे, वर्षा कांबळे, सुरेखा कणवाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अनिल गेडाम तर आभार आशिष मोरे यांनी मानले. (बातमी सोबत फोटो घेणे )

Related posts

‘अनाथांचा नाथ एकनाथ’ याची प्रचिती संकटात असणाऱ्या राज्यातील लोकांना आला: पराग पिंगळे

bol maharashtra

आर्णी पंचायत समिती येथे पैसा दिन साजरा…!

bol maharashtra

“नियम कागदावरच,शहर कचऱ्यात!” – ई-रिक्षा चालक व सफाई कर्मचारी गैरहजर;नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

bol maharashtra