Bol Maharashtra
बिना केटेगरी

ओम साई नगरच्या बोरवेलमध्ये केमिकल मिक्स – नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 

BIC, ज्योती वायर, आकार टूल कंपन्या वर- नागरिकांचा रोष

 

गंगापूर ता.प्रतिनिधी/शिवाजी गायकवाड

 

वाळूज एमआयडीसी लगतच्या ओम साई नगर, कमलापूर आणि बाळासाहेब ठाकरे चौक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बोरवेलच्या पाण्यामुळे नागरिकांना गंभीर त्वचा विकारांचा सामना करावा लागत आहे. या पाणी प्रदूषणासाठी *ज्योती वायर, भारत इन्सुलेशन कंपनी (BIC) आणि आकार टूल्स* या तीन कंपन्यांनी बेकायदेशीरपणे रासायनिक सांडपाणी जमिनीत सोडले असल्याचा थेट आरोप स्थानिक रहिवाशांनी करत प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन सादर केले

 

निवेदनानुसार, या कंपन्यांचे प्रदूषित पाणी भूगर्भात मिसळल्याने परिसरातील विहिरी आणि बोरवेलचे पाणी वापरण्यास अयोग्य झाले आहे. शासनाच्या नियमानुसार सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडणे बंधनकारक असताना कंपन्यांकडून त्याचे पालन होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

*त्वच्या रोगाने प्रत्येक घर त्रस्त*

या दूषित पाण्यामुळे लहान मुले, महिला आणि पुरुषांमध्ये तीव्र खाज, अंगावर पुरळ, फोड, खरुज आणि इतर गंभीर त्वचा विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

* 7 दिवसांचा अल्टिमेटम

या पार्श्वभूमीवर *डॉ. श्याम शेळके, प्रवीण साबळे, शिवाजी गायकवाड, राजेंद्र कडू, उमेश टाक यांच्यासह नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, MIDC आणि पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करत, सात दिवसात आमचा प्रश्न मार्गी न लावल्यास आम्ही नागरिक, महिला ,मुलासह कुठलीही पूर्व सूचना न देता तीव्र आंदोलन किंवा चक्काजाम आंदोलन करू असा इशारा दिला.

 

निवेदनात त्यांनी 4 प्रमुख मागण्या केल्या आहेत:

1. 48 तासांच्या आत MPCB आणि MIDC अधिकाऱ्यांनी तीनही कंपन्यांची पाहणी करून बेकायदेशीर बोर बंद करावेत.

2. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि IPC कलम 278, 284 अंतर्गत कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

3. आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासून त्वचारोग निदान शिबिर. आयोजित करावे.

4. कंपन्यांच्या खर्चाने टँकरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

 

 

केमिकल युक्त पाण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळांनी 48 तासात कारवाई करणे अपेक्षित आहे. नागरिकांना होत असलेला त्रास आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे. त्रस्त नागरिकासह आम्ही न्यायासाठी लढायला तयार आहोत. डॉ. श्याम शेळके (समाजसेवक)

 

आमच्या परिसरात ,घरोघरी त्वचाविकाराने त्रस्त नागरिक आहे. नागरिक ,महिला ,मुलं कोणीही या त्वचा विकारापासून सुरक्षित नाही. केमिकल युक्त पाण्याचा बंदोबस्त प्रदूषण नियंत्रण मंडळाने करून द्यावा. -प्रवीण साबळे

 

बोरवेल मधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे आमच्या परिसरातील नागरिकांना त्वचेचे अनेक आजार उद्भवत आहे. बोरवेल च्या पाण्यात सुधारणा झाली पाहिजे.-उमेश टाक

 

केमिकल युक्त पाण्याचा त्रास कायमस्वरूपी आहे. या अगोदरही याच कंपनी विरोधात अशाच पद्धतीच्या तक्रारी केलेल्या होत्या परंतु यांची परिस्थिती आहे तशीच आहे, नियमानुसार त्यांनी दूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच ते जमिनीत सोडणे अपेक्षित असतं. पण आता आम्ही यांचा बंदोबस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. -राजेंद्र कडू (शिवसेना राष्ट्रीय श्रमिक कामगार सेना)

केमिकल युक्त पाण्यासंदर्भात आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे आमचे पथक तपासणी करायला जाणार आहे. चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. -श्री. नांदवटे (उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ छत्रपती संभाजी नगर)

 

 

 

Related posts

शेवटच्या क्षणा पर्यंत पक्षावर विश्वास ठेवला पण,जाकीर सोलंकी यांनी सोडली काँग्रेस ची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश..!

bol maharashtra

अलविदा दादा..अजित पवार पंचतत्वात विलीन..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..!

bol maharashtra

सशक्तराष्ट्र निर्मितसाठी युवकांची संघटित शक्ती आवश्यक :ना. संजय राठोड

bol maharashtra