Bol Maharashtra
बिना केटेगरी

अलविदा दादा..अजित पवार पंचतत्वात विलीन..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..!

महाराष्ट्र राज्याला शोक सागरात बुडवत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. काल घडलेल्या दुःखद घटने नंतर बारामतीत लाखो लोकांचा दुःखी जनसागर उसळला होता

आपल्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी व त्यांचे अंत्य दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व सहकारी आमदार खासदार व आजी माजी लोकप्रतिनिधी व चाहता वर्ग उपस्थित होते.

स्व.दादांचे पार्थिव तिरंग्या ध्वजात काठेवाडीतील त्यांच्या निवासस्थान येथून विद्या मंदिर प्रांगणात आणण्यात आला.यावेळी राज्य सरकार च्या वतीने पोलिसांनी बंदुकीच्या सात फैरीझाडून मानवंदना दिली

चितेला भडाग्नी जेष्ठ पुत्र  पार्थ पवार व यश पवार यांनी दिली यावेळी पत्नी खा.सुनेत्रा पवार,बहीण खा.सुप्रिया सुळे, काका जेष्ठ नेते खा.शरद पवार व आमदार रोहित पवार सर्व कुटुंबियांना अश्रू अनावर झाले दादा अमर रहे,दादा परत या परत या घोषणांनी आसमंत दुमदुमला.आपला भाऊ गेला अशा दुःखद भावना महिलांनी व्यक्त केली.

बोल महाराष्ट्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!

Related posts

भावी जि. प.सदस्यांना अजून पहावी लागणार वाट..

bol maharashtra

जनमताचा सन्मान,नेतृत्वाचा आदेश व आर्णी च्या विकासासाठी महायुती:राजुदास जाधव..

bol maharashtra

शेतकरी हिताला प्राधान्य: अनिल आडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती

bol maharashtra