Bol Maharashtra
बिना केटेगरी

यवतमाळ शहरात अळीयुक्त ढोकळ्यांचा प्रकार : आशीर्वाद स्वीट मार्टविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन…

यवतमाळ शहरात अळीयुक्त ढोकळ्यांचा प्रकार : आशीर्वाद स्वीट मार्टविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन…

यवतमाळ,दि.२९ जानेवारी….
शहरातील स्टेट बँक चौक परिसरात असलेल्या आशीर्वाद स्वीट मार्ट येथून विक्री करण्यात आलेल्या ढोकळ्यामध्ये जिवंत अळ्या आढळून आल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून,या प्रकरणी सहायक आयुक्त (अन्न) / अन्न सुरक्षा अधिकारी (FSSAI),यवतमाळ यांच्याकडे (गुरुवार),दिनांक 29 जानेवारी रोजी अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,दिनांक 26 जानेवारी (सोमवार) रोजी सदर दुकानातून खरेदी करण्यात आलेल्या ढोकळ्यामध्ये अळ्या आढळून आल्या.हे ढोकळे यवतमाळ पोलीस दलातील हवालदार मंजुळा किशोर भगत यांनी ड्युटी संपल्यानंतर खरेदी करून घरी नेले होते.लहान बहिणीचा वाढदिवस असल्याने घरी नेण्यात आलेल्या या खाद्यपदार्थाचे सेवन लहान मुलांनीही केले,मात्र वाढदिवसाच्या मुलीने ढोकळा खात असताना त्यामध्ये प्रत्यक्ष अळी आढळून आली.या प्रकारामुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकार हा अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे सरळ उल्लंघन करणारा असून,नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित दुकानाची तात्काळ तपासणी,अन्ननमुने जप्त करून प्रयोगशाळा तपासणी,दोषी आढळल्यास दुकान सील अथवा परवाना रद्द करणे तसेच संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भविष्यात यवतमाळ शहरात अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये,यासाठी अन्न सुरक्षा विभागाने विशेष तपास मोहीम राबवावी,अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन सादर करताना सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके,कॉम्रेड सचिन मनवर,गट्टू भगत,अरविंद राठोड,मोंटू तेलगोटे,विकास साहू,कुणाल शेटे तसेच प्रा.पंढरी पाठे यांची उपस्थिती होती.
या घटनेमुळे यवतमाळ शहरातील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून,आता अन्न सुरक्षा विभाग कोणती ठोस कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

योग्य उपचारांचे फलित : रुग्णाकडून देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सन्मान

bol maharashtra

शहरासाठी तळमळीने झटलेला लोकसेवक भिकमचंद लोया…!

bol maharashtra

लाडक्या बहिणींच्या मतावर नक्की दावा कुणाचा…?

bol maharashtra