Bol Maharashtra
बिना केटेगरी

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज ( पारवा येथे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा एल्गार)

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज
( पारवा येथे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा एल्गार)
घाटंजी /प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पारवा (ता. घाटंजी) येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उत्साहवर्धक बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेसने निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.
या बैठकीचे अध्यक्षपद राज्याचे माजी मंत्री आदरणीय ॲड. शिवाजीराव मोघे यांनी भूषवले. आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या शिदोरीतून मोघे साहेबांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी आवश्यक असलेली रणनीती समजावून सांगितली. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे आगामी निवडणुकांसाठी विजयाचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून, यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा संचारली आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकरावजी मेश्राम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्रभाऊ मोघे, काँग्रेस तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ कल्यमवार आणि माजी समन्वय समिती अध्यक्ष ईकलाख खान यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनी आगामी काळात जनसेवेचा हा रथ असाच जोमाने पुढे नेण्यासाठी आणि घाटंजी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व काँग्रेसजन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला ॲड. विजय भुरे, कांबळे साहेब, राम वाजपेयी, आकाश आत्राम, प्रजय कडू, राजेश निकोडे, बाबाजी पोटपेल्लीवार, जनार्धन रेड्डी, नामदेवराव भोयर, अरविंद चौधरी, अशोक जिलरवार, बळीराम उईके, राजुभाऊ हिवणे, मोहूर्ले सर, सुनिल हुड, अक्षय पवार, बाबुभाई शेख, निलेश कडू, पुंजाजी आत्राम, विजय देवतळे, संजय कोल्हे, गणेश वलपवार, दिपक भवरे, नारायण ठाकरे, पुंडलिक बिबेकर, प्रेम वेटृटी आणि राहुल आत्राम यांच्यासह काँग्रेसचे अनेक निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक गणेश मुद्दुलवार यांनी केले. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले आहेत.

Related posts

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ जिल्ह्यात

bol maharashtra

शिरूर मांजरे वस्तीत मुलाचा मृत्यू, घातपात झाल्या चा कुटुंबियांनी केला संशय व्यक्त…!

bol maharashtra

शेवटच्या क्षणा पर्यंत पक्षावर विश्वास ठेवला पण,जाकीर सोलंकी यांनी सोडली काँग्रेस ची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश..!

bol maharashtra