Bol Maharashtra
बिना केटेगरी

शेवटच्या क्षणा पर्यंत पक्षावर विश्वास ठेवला पण,जाकीर सोलंकी यांनी सोडली काँग्रेस ची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश..!

अठरा वर्ष अनेक निवडणुका पक्ष व पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्या वर विश्वास ठेवून काम करत आलो पण जेव्हा पहिल्यांदा पक्षा कडे कार्यकर्ता म्हणून नगरपरिषद ची उमेदवारी मागितली तेव्हा देखील मला झुरवत ठेवले पण मी अंध विश्वास ठेवला आणि शेवटच्या क्षणी माझी उमेदवारी नाकारून ऐनवेळी पक्षाचे चिन्ह आयात उमेदवाराला देण्यात आले त्यासाठी मला उमेदवरी का नाकारण्यात अली हे देखील कोणी सांगितले नाही
जेथे आता किंमत उरली नाही तेथे आता कामच करायचे नाही म्हणून आता माझ्या कारकिर्दीचा नवा अद्याय शिवसेने सोबत रचायचा आहे
आपण मला पक्षात प्रवेश दिला त्या प्रमाणे सांभाळून घ्या असे परखड मत युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष जाकीर सोलंकी यांनी व्यक्त केले ते पालकमंत्री ना. संजय भाऊ राठोड यांच्या समोर आपल्या भावना व्यक्त करत होते त्यांच्या सोबत शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी ना.संजय राठोड,जिवन पाटील,सलीम खेतानी,शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख राजुदास जाधव,उप जिल्हा प्रमुख डॉ.विष्णू उकंडे,जिल्हा सह संपर्क प्रमुख रवी राठोड,शेतकरी सेने चे पश्चिम विदर्भ समनव्ययक प्रमोद कुदळे,तालुका प्रमुख राजेंद्र जाधव उपस्थित होते.

Related posts

भावी जि. प.सदस्यांना अजून पहावी लागणार वाट..

bol maharashtra

जनमताचा सन्मान,नेतृत्वाचा आदेश व आर्णी च्या विकासासाठी महायुती:राजुदास जाधव..

bol maharashtra

जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीकविमा लाभा पासून वंचित रहाणार नाही, पालकमंत्री ना. संजय राठोड यांची ग्वाही पुढाकार घेऊन लवकरच तोडगा काढणार..!

bol maharashtra