Bol Maharashtra
बिना केटेगरी

शहराच्या विकासासाठी शिवसेनेला विजयी करा:ना.संजय राठोड

शहराच्या विकासासाठी शिवसेनेला विजयी करा:ना.संजय राठोड
शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे नगरविकास मंत्रालय आहे त्यांनी मुख्यमंत्री असतांना अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,वयोश्री,लाडका भाऊ,पीकविमा,इन डी आर एफ निकशा पेक्षा जास्त नुकसान भरपाई चा निर्णय त्यांनी घेतला मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे १००० कोटी रुवयाचे विकास कामाचे नियोजन मी करतो,४०० कोटी रुपये खनिज विकास निधी चे वितरण करतो
म्हणून आर्णी शहरास विकासा च्या दृष्टीने शिवसेना सत्तेत आवश्यक असल्याचे मत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व मृद व जलसंधारन मंत्री ना.संजय भाऊ राठोड म्हणाले
आर्णी नगरपरिषद निवडणुकीसाठी बूथ प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की माझ्या सारखा सामान्य माणूस ज्याला कुठलाही राजकीय वारसा नाही
केवळ शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन गेली २८-३० वर्ष सेवेची कामे करतो आहो यवतमाळ जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर झाडा खाली बसून सुरवात केली.आज तेथे मातोश्री रुग्ण मदत केंद्र आहे,आम्ही हजारो बॉटल रक्तदान करतो आमचे रक्त कोणत्या जाती धर्माच्या लोकांना दिल्या जाते माहीत नाही म्हणून सेवेला धर्म जात नसते आम्हीही ती पहात नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तेव्हाही व आज उपमुख्यमंत्री असतांना देखील कॉमन मॅन स्वतःला म्हणतात असेही त्यांनी नमूद केले
बूथ प्रमुख हा महत्वाचा दुवा असून त्यांनी परिश्रम घेतले पाहिजे.
शिवसेनेचे विकास कार्य लोकां पर्यंत पोहचवा.असेही यावेळी ते म्हणाले.
आर्णी च्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न आपण सोडवला.आर्णी पोलीस स्टेशन च्या जागेचा प्रश्न आपण निकाली काढला त्या साठी तत्कालीन ठाणेदार पितांबर जाधव यांनीही माझ्या कडे पाठपुरावा केला हेही ना.संजय भाऊ राठोड यांनी नमूद केले.
आई वारल्या ची दुःखद घटना घडली निवडणुका थांबत नाहीत म्हणून आपल्या लोकांच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी म्हणून मी घरा बाहेर पडलो आता विजयासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
कुणाल मनवर हे नगरादयक्ष पदाचे उमेदवार असून त्यांच्या सोबत शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन देखील करून मी पुन्हा प्रचारात भाग घेईल असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा प्रमुख राजुदास जाधव यांनी प्रास्ताविक केले आर्णीत आज जे फिक्सिंग चे राजकारण आहे त्याला जनता वैतागली असून तेच ते लोक निवडण्या पेक्षा शिवसेनेने रुग्णसेवक निलेश गावंडे वगळता इतर सर्व नव्या चेहऱ्याना संधी दिली आहे रुग्णसेवेत निलेश गावंडे व कुणाल मनवर यांचे प्रचंड काम आहे असे गौरोउद्गगार त्यांनी काढून पालकमंत्री संजय राठोड यांनी आर्णी ची पाणीपुरवठा योजना, पोलीस स्टेशन जागेचा प्रश्न,सिसोदिया ले आऊट ग्रीन पार्क च्या लोकांचा डी पी व अतिक्रमण चा प्रश्न सोडवला असेही ते म्हणाले.व शिवसेनेच्या विजयाची हमी यावेळी त्यांनी दिली.
यावेळी जेष्ठ नेते जीवन देवराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले त्यांनी निवडणुकी चे तंत्र समजून सांगितले. व मी आर्णी चा पुत्र आहे मला कधीही आवाज द्या मी हजर राहीन असेही ते शेवटी म्हणाले. शिवसेनेचे नगरादयक्ष पदाचे उमेदवार
कुणाल मनवर राजू राऊत व सिसोदिया च्या नागरिक मंडळींनी पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचे आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर ना.संजय भाऊ राठोड शिवसेना जेष्ठ नेते जीवन पाटील,सलीम खेतानी, जिल्हा प्रमुख राजुदास जाधव,उपजिल्हा प्रमुख विष्णू उकंडे, जिल्हा सह संपर्क प्रमुख रवी राठोड, शेतकरी सेना पश्चिम विदर्भ समनव्यएक प्रमोद कुदळे, तालुका प्रमुख राजेंद्र जाधव होते
तर संचलन शहर सनव्यएक सुरेश पवार,आभार कुणाल मनवर यांनी मानले.
यावेळी या बैठकीस शिक्षक महिला आघाडी तालुका प्रमुख अश्विनीताई देशमुख, शहर प्रमुख संध्याताई मुनेश्वर, मोरे ताई,बुचके ताई, शिक्षक आघाडी तालुका प्रमुख टी डी चव्हाण सर,रघुनाथ मुंडवाईक सर,
युवा सेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख व वार्ड ७ चे उमेदवार अभिलाष इंगोले,
युवा सेना शहर प्रमुख मोहित नेमाडे, रुग्णसेवक माजी नगरपरिषद सभापती निलेश गावंडे,नगरादयक्ष पदाचे उमेदवार कुणाल मनवर सर्व शिवसेना उमेदवार उपस्थित होते.
————-
जाकीर सोलंकीने केला काँग्रेस ला केले अलविदा.
युवा नेते तरुणांत प्रचंड लोकप्रिय असलेले युवक काँग्रेस चे माजी शहराध्यक्ष जाकीर सोलंकी यांनी काँग्रेस चा हात सोडत शिवसेनेत शेकडो युवकांना सोबत घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी जाकीर सोलंकी यांनी सांगितले की गेली १८ वर्ष निष्ठा पूर्वक काँग्रेस पक्षात काम केले मला उमेदवारी मिळेल ही शेवट पर्यंत अपेक्षा ठेऊन होतो मला इतर पक्षा कडून ऑफर आल्या पण पक्षा वरील आंधळ्या प्रेमा पोटी मी नकार दिला मात्र माझी उमेदवारी कापून ऐनवेळी बाहेर च्या उमेदवाराला उमेदवार करण्यात आले म्हणून मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला
ही माझी नवी सुरवात आहे
आपण मला शिवसेनेत सांभाळून घ्या असेही जाकीर सोलंकी म्हणाले.यावेळी युवा उद्योजक अमोल पवार यांनीही पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.

Related posts

भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध:आ. बाळासाहेब मांगुळकर

bol maharashtra

वणी शहर प्रदूषण मुक्त करू:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही..!

bol maharashtra

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधक हतबल का झाले असावे…?

bol maharashtra