Bol Maharashtra
महाराष्ट्र

बिबट्याला हद्दपार करण्यासाठी शेतकरी एकवटले..!

प्रतिनिधि / संदीप ढाकुलकर (शिक्रापूर)

* बिबटे हद्दपार करण्यासाठी जन आंदोलन शिरूर तहसील या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवाचा उस्तूर्फ प्रतिसाद*

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, जांबुत, आलेगाव पागा, निमगाव म्हाळुंगी,रांजणगाव सांडस, भांबर्डे,उरळगाव, इनामगाव, मांडवगण फराटा,बुरूंज वाडी,दिघे वस्ती,शिक्रापूर,या गावांसह अनेक गावांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे माणसांवर आणि पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा प्राणघातक हल्ले झाल्यामुळे जीव गमवावा लागला असून संपूर्ण शिरूर तालुक्यात मोठया प्रमाणात भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे.या त्रासावर वन विभागातील प्रशासनाने शिरूर तालुक्यातील सर्व बिबट्या एका महिन्यात हद्दपार करावे आणि ग्रामस्थांना व शेळ्या मेंढ्या गाय वासरे पाळीव प्राणी मिळणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी आपण सर्वजण शांततापूर्ण आंदोलन आयोजित केले होते असे मत बापू काळे मा सरपंच *शिरूर तालुका बिबट्या हद्दपार जन आंदोलन संघर्ष समिती यांनी मत व्यक्त केले आहे तसे निवेदन तहसील कार्यालय, वनविभाग,व पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे तसेच नाईक साहेब वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कार्यालय मार्फत फॅक्स द्वारा एक प्रत पाठवण्यात आली आहे, व आमदार बापूसाहेब पठारे यांना देखील एक प्रत आलेगाव पागा या ठिकाणी देण्यात आली आहे, आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपण या समितीच्या मागण्याच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये आवाज उठवनार असल्याचे सर्व समितीचे पदाधिकारी यांना सांगितले

Related posts

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

आर्णी नगरपरिषद मध्ये मनरेगा कक्ष स्थापन करण्याचे आव्हान…!

bol maharashtra

“नियम कागदावरच,शहर कचऱ्यात!” – ई-रिक्षा चालक व सफाई कर्मचारी गैरहजर;नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

bol maharashtra