Bol Maharashtra
बिना केटेगरी

जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीकविमा लाभा पासून वंचित रहाणार नाही, पालकमंत्री ना. संजय राठोड यांची ग्वाही पुढाकार घेऊन लवकरच तोडगा काढणार..!

पीक विमा लाभा पासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वगळल्या बाबत मोठा गैरसमज निर्माण झाला होता.

ती बाबा म्हणजे तांत्रिक चूक होती ही बाब यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व मृड व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गांभीर्याने घेतली व तातडीने  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री व कृषी सचिव यांना ही बाबा लक्षात आणून दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाची गांभीर्याने दखल घेतली आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई जाहीर झाली असताना यवतमाळ जिल्ह्याचे नाव यादीत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र ही बाब तांत्रिक त्रुटीमुळे घडली असून, पोर्टलवर रक्कम शून्य दिसत आहे.

या संदर्भात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात  आले आहेत.

जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळांची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित मंडळांची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

Related posts

यवतमाळ शहरात अळीयुक्त ढोकळ्यांचा प्रकार : आशीर्वाद स्वीट मार्टविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन…

bol maharashtra

आर्णीत अभूतपूर्व भक्तीयोग, शेकडो वर्षात एकदा येते असा योग, बाबा कंबलपोष वपेंटर बाबा चा संदल एकाच दिवशी…!

bol maharashtra

गाईच्या तुपाचे अनेक फायदे.. !

bol maharashtra