Bol Maharashtra
सामाजिक

आज आर्णीत स्व.अजित दादांना सामूहिक सर्वपक्षीय श्रद्धांजली शोकसभा…!

महाराष्ट्र राज्याचे कणखर,बेधडक,विकासाची दूरदृष्टी असणारा नेता उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे मुंबई वरून बारामती जात असताना एका विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले.

 

त्यांच्यावर बारामती च्या विद्या मंदिर परिसरात अंतिम संस्कार करण्यात आले. स्व.अजित दादा यांच्या निधनाने राज्य व देश हळहळला स्व.अजित दादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आर्णी येथे एका शोक सभेचे व सामूहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आज ३१ जानेवारी २०२६ ला दुपारी ३ वाजता  ही श्रद्धांजली सभा माहेर मंगल कार्यालय आर्णी येथे होत असून यासभेत आर्णी शहर, तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते, अधिकारी पत्रकार व  नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या लाडक्या नेतृत्वाला श्रद्धांजली अर्पण करावी  असे आवाहन श्रद्धांजली सभेच्या आयोजकांनी केले आहे.

Related posts

पर्यावरण रक्षणासाठी परसोडा ग्रामपंचायत एक पाऊल पुढे, प्लास्टिक बंदी चा निर्णय..!

bol maharashtra

मनं जिंकणारा अधिकारी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ..!

bol maharashtra

रस्त्यात झाड लावून गांधीगिरी ..! प्रहार च्या आंदोलनास यश रस्त्याचे काम झाले सुरू.

bol maharashtra