Bol Maharashtra
सामाजिक

चिमुकल्या बहिणींचा पहिला रोजा; पत्रकार सद्दाम शेख कुटुंबाचा आनंद द्विगुणित!

चिमुकल्या बहिणींचा पहिला रोजा; पत्रकार सद्दाम शेख कुटुंबाचा आनंद द्विगुणित!

आर्णी : पवित्र रमजान महिन्यात संयम, श्रद्धा आणि इबादतीचा संदेश देणाऱ्या रोज्यांच्या पार्श्वभूमीवर आर्णीत शेख कुटुंबात अभिमानाचा आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. शहरातील पत्रकार सद्दाम शेख यांच्या दोन्ही कन्यांनी आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करत धार्मिक संस्कारांची सुंदर झलक दाखवली.
मोठी कन्या अलमीरा सद्दाम शेख (वय ७ वर्षे) आणि धाकटी रीदा सद्दाम शेख (वय ५ वर्षे) या दोन्ही चिमुकल्या बहिणींनी तब्बल सुमारे १४ तास अन्न-पाण्याचा त्याग करून सायंकाळी इफ्तारवेळी रोजा पूर्ण केला. एवढ्या लहान वयात दाखवलेली त्यांची श्रद्धा, संयम आणि चिकाटी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हा क्षण पत्रकार सद्दाम शेख यांच्यासाठी केवळ कौटुंबिक आनंदाचा नसून धार्मिक मूल्यांची जपणूक करणारा अभिमानाचा ठरला आहे. कुटुंबीयांच्या मते, घरातील धार्मिक वातावरण आणि संस्कारांमुळेच दोन्ही मुलींमध्ये रोजाबाबतची ओढ निर्माण झाली.
विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच सद्दाम शेख यांनी कुटुंबासह पवित्र उमराह यात्रा पूर्ण केली होती. मक्का आणि मदीना येथे कुटुंबासमवेत इबादत करताना अलमीरा व रीदा यांनीही आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला होता. त्या पवित्र यात्रेतील संस्कारांचेच हे गोड फळ असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
आर्णी शहरासह मुबारक नगर परिसरात या दोन्ही चिमुकल्या बहिणींच्या पहिल्या रोज्याबद्दल कौतुक व्यक्त होत असून, सद्दाम शेख यांच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related posts

आरोग्य सेवे चे कार्य प्रशंसनिय:माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस च्या आरोग्य सेवेला उस्फुर्त प्रतिसाद..!

bol maharashtra

निवडणुकीची ‘ओवाळणी’ संपली, लाखो बहिणींच्या ओवाळणीला केवायसीचे ग्रहण.

bol maharashtra

यवतमाळ येथे पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

bol maharashtra