Bol Maharashtra
धर्म - कर्म सामाजिक

श्री क्षेत्र तुळापूर व श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे रक्तदान शिबिर संपन्न..!

श्री क्षेत्र तुळापूर व श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे रक्तदान शिबिर संपन्न..!

कोरेगाव भीमा : संदिप ढाकुलकर

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त श्री क्षेत्र तुळापूर व श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे रविवार दिनांक २२ रोजी रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.या शिबिरास शंभू भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसात दिला.

शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट श्री क्षेत्र तुळापूर व ग्रामस्थ यांच्या वतीने श्री क्षेत्र तुळापूर (ता.हवेली) येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास जिल्हा रुग्णालय औंध व रेड प्लस ब्लड बँक भोसरी यांनी सहकार्य केले असून या रक्तदान शिबिरास ५०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांसाठी ५० बेडची व्यवस्था करण्यात आली होती.
या वेळी शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट श्रीक्षेत्र तुळापूरचे अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

———————————–

श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेल्या
रक्तदान शिबिरास पुणे सर्जिकल इन्स्टिट्यूट,तर्पण ब्लड सेंटर व अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले असून या रक्तदान शिबिरास तब्बल ५२७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांसाठी सुमारे ४०० बेडची व्यवस्था करण्यात आली होती.या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Related posts

शिक्रापूर शिरूर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी..!

bol maharashtra

लाडक्या बहिणीं’चा संताप कामी आला, ८६ लाख महिलांच्या अडकलेल्या हप्त्यांचा मार्ग मोकळा. सौ. राधाबाई कामारकर यांच्या मागणीला यश

bol maharashtra

अरुणावती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र शिवरामवार यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड…!

bol maharashtra