Bol Maharashtra
ग्रामपंचायत

ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामस्थांसाठी सुविधाजनक कार्य व्हावे:खा.प्रतिभाताई पाटील

गावच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणजे ग्रामपंचायत ग्रामपंचायत इमारत म्हणजे केवळ वास्तू नाही तर ही इमारत गावच्या नागरिकांना सुविधा देणारे केंद्र बनले पाहिजे असे मत आर्णी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांनी व्यक्त केले.

लोणी पंचायत समिती आर्णी जिल्हा यवतमाळ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारती चे उद्घाटन खा.प्रतिभाताई धानोरकर व आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी केले.

ग्रामपंचायत कार्यालय, लोणी (पं.स. आर्णी, जि. प. यवतमाळ) या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून ग्रामपंचायत कार्यालयाचे विधिवत  यावेळी उद्घाटन करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याला मा. आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम (आर्णी–केळापूर विधानसभा), मा. श्री. शिवाजीराव शिवरामजी मोघे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. श्री. मनीष उत्तमराव पाटील (अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ), मा. श्री. रमेश राजाराम खरोडे (गटविकास अधिकारी, पं.स. आर्णी) मा. श्री. राजुदास जाधव, मा. श्री. जितेंद्र भाऊ मोघे, मा. श्री. मनिष पाटील, मा. श्री. आरीज बेग, मा. श्री. राजेंद्र जाधव, मा. श्री. राजाभाऊ विरखेडे, मा. श्री. परसराम राठोड, मा. श्री. राजुभाऊ गावंडे, सौ. किरणताई मोघे, मा. श्री. नरेश राठोड, मा. श्री. अमोल वारंगे आणि सौ.प्रियाताई वांरंगे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे प्रशासन अधिक गतिमान होऊन, नागरिकांच्या समस्या वेळेत आणि प्रभावीपणे सोडविण्यास निश्चितच मदत होणार आहे. यामुळे गावाच्या विकासकामांना वेग येईल आणि पारदर्शक, लोकाभिमुख कारभार अधिक सक्षम होईल.
ग्रामविकास, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

लोणी गावाच्या प्रगतीसाठी ही इमारत एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास   यावेळीव्यक्त करण्यात आला.

 

Related posts

अभिनव उपक्रम राबवून परसोडा ग्रामपंचायत जपत आहे सामाजिक भान…!

bol maharashtra

तळणीतील एसबीएम कामावर प्रश्नचिन्ह

bol maharashtra