तळणीतील एसबीएम कामावर प्रश्नचिन्ह
तळणी (ता. आर्णी): ग्रामपंचायत तळणी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन शेड व शोष खड्डे बांधकामाच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्ष पाहणी केली असता काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
घनकचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेले शेड गावापासून सुमारे १ कि.मी. अंतरावर असल्याचे सांगण्यात येत असून संबंधित जागेची नोंद ८-अ उताऱ्यात आहे का, याबाबतही शंका व्यक्त होत आहे. या प्रकरणाची तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मा.गटविकास अधिकारी पं.स आर्णी याच्या कडे निशांत मधुकर हलबी यांनी केली आहे.
previous post
