Bol Maharashtra
धर्म - कर्म

पं. प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवानीतून आर्णीत शिवपूरान आयोजनाची जय्यत तयारी..!

आर्णी येथे ३० मार्चपासून पंडित प्रदीप मिश्रा यांची महाशिवपुराण कथा; जय्यत तयारी सुरु

श्री बहिरमदेव सेवा समिती ट्रस्टच्यावतीने आर्णी येथे जगप्रसिद्ध पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे.

या साठी प्रिया नर्सरी समोरिल भारती यांच्या शेतात दि ३० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या कथापर्वाकरिता भव्य दिव्य होणार्या या कथेची पुर्व जय्यत तयारी सुरु आहे। व याची माहिती समिति च्या वतिने पत्रपरिषदेत दिली.

आयोजित शिवमहापुराण कथेसाठी या 3 लाख स्क्वेअर फुटचा मंडप तसेच सिसिटिवी कॅमेरे, ड्रोनद्वारे संपुर्ण परिसरावर

नजर ठेवली जाईल मंडप राहणार तसेच विभिन्न समित्या राहणार असून त्या माध्यमातून कार्य करण्यात येईल तसेच सुरक्षासाठी यवतमाळ, आर्णी पोलिस प्रशासनची विशेष गर्दी व्यवस्थापन टिम कार्य करेल व आरोग्य, व जलसुविधा साठी तात्पुरते अस्थाई समित्या गठीत केल्या आहेत.

रुग्णालय व वॉटर ग्रिडच्या माध्यमातुन शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल असल्याची माहिती शनिवारी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. येथील प्रिया नर्सरी समोरील भारती यांच्या शेतपरिसरात कथापर्व होणार आहे. याकरिता विविध

समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मंडपाच्या कामाला लगेच सुरुवात केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला समितीचे विनायक थोडगे, अजय छल्लानी, सुनील चोरडिया, ब्रह्मा गुप्ता, अरविंद सरोदे, सचिन दीपेवार, दिलीप चिंतावार, शंकर मारबते, पवन पनपालिया, संतोष जैस्वाल, दर्शन कोषटवार, विनोद माहेश्वरी, गोपाल कोठारी, भिकुभाई पटेल गोपाल शर्मा, मुन्ना यादव, रवी नालमवार, भोपी पटेल, नरसिंग जाधव, रंजित राठोड, शैलेश केशरवानी, पुरुषोत्तम इंगोले, पीयूष बजाज, ललित पटेल, उपस्थित होते.

Related posts

गोरक्षकांनी दिले ६२ गाईंना जीवदान,पोलिसांनी केली सुटका…!

bol maharashtra

बंजारा समाजाची संस्कृती,विरासत जपण्यासाठी संजय राठोड यांनी केलेले परिश्रम उल्लेखनीय…!

bol maharashtra

संत सेवालाल महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज;ना.संजय भाऊ राठोड

bol maharashtra