Bol Maharashtra
ग्रामपंचायत सामाजिक

अभिनव उपक्रम राबवून परसोडा ग्रामपंचायत जपत आहे सामाजिक भान…!

ग्राम समृद्धी साठी जेव्हा गावाचे पुढारी कारभारी व गावकरी एकत्र येत झटून काम करतात त्या गावचा चेहरा मोहरा बदलून जातो.

आर्णी तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत ही एक आदर्श ग्रामपंचायत ठरत असून आर्णी पंचायत समितीच्या इतिहासात इतर ग्रामपंचायत साठी प्रेरणादायी ठरत आहे.

या गावचे सरपंच म्हणून जेव्हा अतुल देशमुख झाले तेव्हा त्यांनी गावच्या विकास साधण्यासाठी गावात पक्के रस्ते,पक्क्या सिमेंट नाल्या गावातील नागरिकांना वयक्तिक लाभाच्या शासकीय योजनेचा लाभ घराच्या मिळकत पत्रिकेवर महिलांचे नाव नोंदवण्या चा ऐतिहासिक निर्णय असो की शेत पांदण रस्ता असो की गावातील ग्रामपंचायत इमारत वा अंगणवाडी प्राथमिक शाळा अगदी सुसज्ज केली

गावातील स्मशानभूमी म्हणजे जणू चैतन्य भूमी केली तेथे  हिरवळ फुलवली महादेव मूर्ती बसवली हे सर्व काम करतांना आता अतुल देशमुख यांच्या सौभाग्यवती ह्या सरपंच आहेत त्यांना देखील अतुल देशमुख व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोलाची साथ देतात 

परसोडा ग्रामपंचायत ला शासन स्तरावर आदर्श गावचे विविध पुरस्कार प्राप्त आहेत गावात मोफत दळण देण्यात येते असे काम करणारी परसोडा ही आर्णी  तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

परसोडा ग्रामपंचायत द्वारे कचरा कुंडी चे महिलांना वाटप
*हळदी कुंकू प्रोग्राम मधुन प्लास्टिक मुक्त गावासाठी ग्रामपंचायत चा पुढाकार*
आर्णी :परसोडा ग्रामपंचायत द्वारे प्रत्येक कुटुंबातील महिलांना प्लास्टिक निर्मूलन व कचरा व्यवस्थापण करणे संदर्भात हळदी कुंकवाचे औचित्य साधून कचरा कुंडी चे वाटप सरपंच सौ स्वप्ना अतुल पाटील देशमुख यांचे उपस्थितीती मध्ये करण्यात आले.
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत परसोडा ग्रामपंचायत द्वारे महिलांना प्लास्टिक निर्मूलन व कचरा व्यवस्थापन करणे संदर्भात हळदी कुंकवाचे औचित्य साधून गावातील प्रत्येक कुटुंबातील स्त्रियांना ग्रामपंचायत मध्ये कचरा कुंडी चे वाटप करण्यात आले ह्यातून प्लास्टिक मुक्त गावाचा सामाजिक संदेश देऊन गावातून प्लास्टिक हद्द पार करण्याचा उद्देश आहे. ह्यावेळी सरपंच प्रा स्वप्ना अतुल पाटील देशमुख, उपसरपंच सुनंदा पत्रे, मंगला चौधरी, अर्चना राठोड ग्रामपंचायत सदस्य, रोशनी ग्रामसंघ अध्यक्ष स्वाती पत्रे, पशु सखी आशा सोळंके, प्रभात संघ प्रमुख संध्या देशमुख, मंदा कोल्हे, जनिता गुडे, मंजुषा मिसाळ, राजश्री कोल्हे, सारिका कोल्हे, नलू पारधी, इंदिरा सोळंके, कमला जुडे, गहुकर्णा कुडवे, अनुसया पत्रे,रेखा गुडे, वनिता शेळके, वनिता डहाणे,सुनिता देशमुख, लक्ष्मी सोळंके, सुनिता सोळंके, बेबीबाई राठोड,पायल पवार, कल्पना जाधव, सविता जाधव, पुष्पा जाधव, चंदा जाधव यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.                 

 

Related posts

पंचायत समिती सदस्यांना विधानपरिषदेत मतदानाचा हक्क व विकास निधी द्यावा:विजयसिंह राठोड

bol maharashtra

नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी सामाजिक जाणिव जपत केले स्वखर्चाने कचरा कुंडी चे वाटप…!

bol maharashtra

कृष्णा पुसनाके,कॉम्रेड सचिन मनवर व प्रा.पंढरी पाठे यांनी दखल घेताच बोगस खवा-पेढा फॅक्टरी तात्काळ सील

bol maharashtra