Bol Maharashtra
निवडणूक राजकारण

अखेर चंद्रपुरात भाजप व शिवसेना उबाठा एकत्र..?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीत लढून भारतीय जनता पक्ष व शिवसेनेला स्पस्ट बहुमत मिळाले मात्र मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ला सोबत घेऊन सत्ता स्थापण केली व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे झाले.

मात्र अडीच वर्षाने शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले व उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले त्या नंतर शिवसेना फुटली न्यायालयात गेले तेथे शिवसेना पक्ष व पक्ष चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या कडे दिले अजूनही हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडी ला चांगले यश मिळाले पण नंतर महा युती ने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आता तर महा नगर पालिका  जिल्हा नगर पालिका नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ने घवघवीत यश मिळवले

आता ग्रामीण भागातील मिनी विधान सभा निवडणुकीत जिल्हापरिषद निवडणुकीत पुन्हा महा युतीणे महा विकास आघाडी चा सफाया केला.

अशात आता शिवसेना उबाठा व भारतीय जनता पक्ष जे कधी जवळचे मित्र होते  ती युती तुटल्याने आता चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जाणार असल्याने जुने सोबती या निमित्ताने एकत्र पहायला मिळतील..!

Related posts

महापालिका रणांगण निवडणुकी ची घोषणा ,मुंबई साठी सर्वांचाच रहाणार जोर…!

bol maharashtra

अरुणावती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र शिवरामवार यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड…!

bol maharashtra

त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान,पुंजानी यांची याचिका उद्याच सुनावणी…!

bol maharashtra