Bol Maharashtra
निवडणूक

सलीम खेतानी ठरणार गेम चेंजर,किंग मेकर…घाटंजी, पांढरकवडा शिवसेनेने टाकला विश्वास…!

मूळ पांढरकवडा येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक सलीम खेतानी याच्यावर शिवसेनेने मोठा विश्वास टाकला असून पांढरकवडा नगरपरिषद वर एक हाती सत्ता मिळणारे सलीम खेतानी हे आपल्या लोकांना नगरपरिषद मध्ये पाठवण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतात.
स्वतः मात्र सत्तेत सहभागी होत नाहीत ते आपल्या पांढरकवडा शहरात व परिसरात खेतानी फाउंडेशन च्या माध्यमातून गरीब गरजू लोकांना आरोग्य सेवा,तपासणी उपचार,लग्न कार्य व अनाथांना मदत करतात
संकट अथवा आपत्ती कुठलीही असो जात धर्म न पहाता ते मदत करतात कधीही आपल्या सेवेचा गाजावाजा करत नाहीत,विरोधकांच्या कुठल्याही टीकेला प्रतिउत्तर देत नाहीत अगदी शांत संयमी मृद भाषिक मनमिळाऊ वृत्तीच्या या नेतृत्वावर पांढरकवडा येथील नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे.
सलीम खेतानी हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड यांचे महाविद्यालयात असतांना चे मित्र आहेत तसेच शिवसेना पश्चिम विदर्भ समनवएक पराग पिंगळे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार याचे मित्र आहेत तसेच जिल्हा प्रमुख राजुदास जाधव यांचे ते सहकारी असल्याने त्यांच्यावर पांढरकवडा व घाटंजी नगरपरिषद निवडणुकीची जवाबदारी सोपविण्यात आली असून या दोन्ही नगरपरिषद जिंकण्यासाठी सलीम खेतानी व्यूव्ह रचना करत आहेत.२००९,
२०२४,२०१९ ला आर्णी विधानसभा निवडणुकीत ते किंग मेकर ठरले होते.

Related posts

महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल उद्या वाजणार…!

bol maharashtra

पोलिस बंदोबस्तात शिक्रापूर उपसरपंच पदाची निवडणूक उपसरपंच पदी त्रिनयन कळमकर विजयी..!

bol maharashtra

मूर्ख कोण प्रशासकीय अधिकारी की राजकारणी…

bol maharashtra