Bol Maharashtra
महाराष्ट्र मोठी बातमी राजकारण

एम आय एम राज्य उपाध्यक्ष युसूफसेठ पुंजानी यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी दिली सदिच्छा भेट..!

महाराष्ट्रात एम आय एम पक्षाने महानगर पालिका व नगर पालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली त्या नंतर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युसुफ सेठ पुंजानी यांनी आर्णी येथे येत बाबा कंबलपोष दर्शन घेऊन

ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत एम आय एम पक्षा साठी काम केले त्या निष्ठावंत कार्यकर्त्या च्या घरी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्याचे मनोबल वाढवले येत्या काळात त्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष न्याय देईल असे या भेटीत सांगितले.आगामी काळात पक्ष प्रमुख असुद्दीन ओवेसी व प्रदेश प्रमुख माजी खासदार इम्तियाज जलील याच्या नेतृत्वात आर्णी येथे शेकडो महत्वाचे कार्यकर्ते पक्षात प्रवेश घेऊन पक्ष बळकट करतील अशा प्रकारे नियोजन करण्यात येणार असल्याचे कळते.

 

एम.आय.एम.चे प्रदेश उपाध्यक्ष हाजी युसुफ सेठ पुंजानी यांचा आर्णी दौरा विविध सामाजिक संघटनांना सदीच्छाभेट, आर्णीतील राजकारणात मोठे उलटफेर होणार ।
एम.आय.एम. चे प्रदेश उपाध्यक्ष हाजी युसुफ सेठ पुंजानी यांचा आर्णी दौरा ररिवार दि. ८ फेब्रवारी २०२६ ला अत्यंत उत्साहाने पार पडला. सायंकाळी ७ वाजता विज वितरण कार्यालयापासून शेकडो कार्यकत्यांच्या बाईक रॅली ने या दौऱ्याची सुरुवात झाली. मेन रोड-शिवनेरी चौक ते मुबारक नगर असे मार्गक्रमण करीत निघालेल्या रॅलीचे मुबारक नगर येथील हजरत टिपु सुलतान यांच्या प्रतिमेजवळ फटाक्यांच्या अतिषबाजीसह जंगी स्वागत करण्यात आले. हजरत टिपु सलतान यांच्या प्रतिमेला हार अर्पन करुन युसुफसेठ पुंजानी यांनी एम. आय. एम. पदाधिकारी अली खान यांच्या निवासस्थानी भेट दिली व उपस्थित शेकडो एम.आय.एम कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. तेथुन विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मान्यवरांना सदीच्छा भेट देण्यासाठी पत्रकार इमरान मन्नानबेग मिर्झा यांच्या घरी ते रवाना झाले. त्या ठिकाणी हाजी युसुफ सेठ पुंजानी यांचे सह एम.आय.एम. जिल्हाध्यक्ष सलीमजी सांगवान, एम.आय.एम. पदाधिकारी समशेर लाला, फैजान लाला तसेच कारंजा नगर परिषदेचे नगरसेवक यांचा आर्णी नगर परिषदेचे आरोग्य सभापती मा. अनवर पठाण, माजी उपनगराध्यक्ष कादर इसाणी, माजी नगरसेवक यासीन नागाणी, इसराईल शेख, युनुस शेख, संजयजी वाघमारे, अनिस शेख, जुनेद शेख, कादर डोसाणी, पत्रकार बाधंव तसेच या इलाही हैदरी ग्रुपचे सर्व सदस्य यांचे मार्फत सत्कार करण्यात आला. तसेच फरहान मन्नान बेग यांचेकडे आयोजित अल्पोपहारानंतर ते सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान बाबा कम्बलपोष यांच्या दर्शनासाठी दरगाह शरीफवर रवाना झाले त्या ठिकाणी दरगाह ट्रस्ट तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. व तेथुनच ते एम. आय. एम. चे पदाधिकारी सैयद अमीन यांचे कडे आयोजीत जेवणाच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. या सर्व कार्यक्रमासाठी एम.आय.एम.चे युवा शहर अध्यक्ष आरीफ खान, गजनवी शेख, सुफी रिजवान, अली खान, साजीद शेख, मोहसिन शेख, मतीन खान, शाहरुख नागानी, जावेद शाह, अल्ताफ कुरेशी, हुजैफा शेख, शेख वसीम, शाहीद खान, अयुब शेख, साबीर सुफी, मुबशीर खान, सलाहुद्दीन, सोहेल चव्हाण व असंख्य एम. आय. एम. कार्यकत्यांनी मेहनत घेतली.

Related posts

लोहड़ी व मकर संक्रांति पर गोष्ठी सम्पन्न,पर्व भारतीय संस्कृति की आत्मा हैं-राष्ट्रीय अध्यक्ष अनिल आर्य

Web1Tech

पुलिस अधीक्षक महोदय सिद्धार्थनगर द्वारा शुक्रवार की साप्ताहिक परेड का किया गया निरीक्षण

Web1Tech

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

bol maharashtra