Bol Maharashtra
बिना केटेगरी सामाजिक

सामाजिक संवेदना जपत मुलाचा वाढदिवसाला वृद्धाश्रमात दिले भोजन…!

*चिराग जयस्वाल यांचा वाढदिवस स्वर्गीय सुशीला बाई नागापुरे वृद्धाश्रम येथे साजरा*

आर्णी : तालुक्यातील अंतरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश जयस्वाल यांचे चिरंजीव चिराग जयस्वाल यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवत स्वर्गीय सुशीला बाई नागापुरे वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमातील रहिवाशांना भोजन देण्यात आले.
या उपक्रमामुळे वाढदिवस साधेपणाने आणि समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करण्याचा आदर्श निर्माण झाला असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आर्णी तालुक्यातील अंतरगाव चे पोलीस पाटील चंद्रकांत नाईक, उपसरपंच दिनेश पूसांडे, पत्रकार परवेज बेग, हनीफ भाटी, रफिक तागाले, संजू गावंडे, प्रेम चव्हाण,संजय चव्हाण, अविनाश जयस्वाल,प्रल्हाद राठोड, राजु जयस्वाल, अंकुश जयस्वाल परिवार उपस्थित होते.
स्वर्गीय सुशीला बाई नागापुरे वृद्धाश्रम चे अध्यक्ष खुशाल नागापुरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Related posts

यवतमाळ येथे पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

bol maharashtra

मंत्री गिरीश महाजन यांचा वंचित बहुजन आघाडीने नोंदवला निषेध..!

bol maharashtra

पाणी टंचाई निर्णय होऊ नये म्हणुन युद्ध पातळीवर उपाययोजना करा, पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या आढावा बैठकीत प्रशासनास सूचना…!

bol maharashtra