Bol Maharashtra
मोठी बातमी सामाजिक

पत्रकार हरिओम बघेल यांचा प्रामाणिकपणा,तहसीलदार वाहूरवाघ यांची तत्परता,४० हजाराचा थैला केला परत…!

आर्णी येथील दै.लोकमत चे शहर प्रतिनिधी पत्रकार हरिओम बघेल यांनी आपल्या प्रामाणिकपणाच्या दर्शनाने  वरुड येथील माजी सरपंच सुरेश काळे यांचा विसरलेला ४० हजारे रुपयांची रोख रक्कम असलेला थैला परत काळे यांना दिला.

कामानिमित्त हरिओन बघेल हे तहसिल कार्यालयात आपल्या दुचाकीने गेले तेथे सी सी टीव्ही च्या नजरेत येईल अशा ठिकाणी दुचाकी उभी केली

यावेळी सावली असल्याने तेथे वरुड तुका चे माजी सरपंच सुरेश काळे आले त्यांनी कामानिमित्त एका थैलीत आणलेले २० हजारा चे दोन बंडल असे एकूण ४० हजाराची रोख रक्कम असलेला थैला बघेल याच्या गादीवर ठेवला व गडबडीत तो विसरून गेले.

त्या नंतर काम आटपून बघेल दुचाकी जवळ गेले असता तेथे पडलेला थैला त्यांना दिसला थैलीत पाहिले असता त्यात ४० हजाराची रक्कम होती.

हे पाहून हरिओम बघेल यांनी थेट तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांची भेट घेत थैल्या विषयी माहिती दिली. तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी ततत्परता दाखवत फुटेज पाहिले अन तो थैला सुरेश काळे यांचा असल्याचे दिसताच काळे यांना बोलावले तो वर सुरेश काळे हे हैराण झाले होते.

पण हरिओम बघेल यांनी दाखवकेल्या प्रामाणिक कामामुले व तहसीलदार वाहूरवाघ यांच्या तत्परतेणे काळे यांना त्यांची रक्कम परत मिळाली.

यावेळी सुरेश काळे यांनी हरिओम बघेल व वाहूरवाघ साहेबांचे आभार व्यक्त केले.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची आर्णी तहसिल प्रशासना कडून जय्यत तयारी..!

bol maharashtra

देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या कु.तृष्णा ठवकर ची भारतीय नौदलात निवड…!

bol maharashtra

अखेर शिक्रापूरचा कचरा उचलण्यास सुरुवात प्रहार च्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी ..!

bol maharashtra