Bol Maharashtra
निधन वार्ता

आशाताई घोडेराव यांचे दुःखद निधन..!

सेवानिवृत्त मुख्याध्यापक व जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गजानन घोडेराव सर यांच्या पत्नी व इंजिनिअर तथा वास्तू विशारद  सागर घोडेराव याच्या मातोश्री आशाताई गजानन घोडेराव यांचे वृद्धापकाळात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्या ७६ वर्षाच्या होत्या.

स्व.आशाताई यांच्या पश्चात पती गजानन घोडेराव २ मुले अभियंता सागर व अभियंता प्रशांत घोडेराव दोन विवाहित मुली  व नातवंड व आप्तेष्ट परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी १२/२/२०२६ दुपारी १ वाजता आर्णी येथील माहूर रोड वरील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केल्या जाणार आहे

अंत्ययात्रा  गजानन घोडेराव याचे शास्त्रीनगर निवास स्थाना पासून निघणार आहे.

स्व.आशाताई घोडेराव यांना बोलमहाराष्ट्र परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली