Bol Maharashtra
निधन वार्ता सामाजिक

स्व.दत्ता मेघे यांचे योगदान हे अभूतपूर्व…!

केवळ राजकारणात आमदार खासदार मंत्री म्हणूनच नाही तर सामाजिक संवेदनशील असलेल्या दत्ताजी मेघे यांचे आरोग्य शिक्षण क्षेत्रात असलेले योगदान अभूतपूर्व आहे ते राज्य कधीच विसरू शकत नाही.

अतिशय मनमिळाऊ चिकित्सक व ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्य सेवेचा नेहमी विचार करणाऱ्या दत्ताजी मेघे याचे निधन न भरून निघणारी पोकळी आहे.

काल राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार स्व. दत्ताजी मेघे साहेब यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत दत्ताजींचे योगदान कधीही न विसरता येणारे आहे. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना आज मनामध्ये आहे.

या दुःखद प्रसंगी मेघे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो आणि मेघे परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना.. माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी स्व.दत्ताजी मेघे यांना श्रद्धांजली वाहताना केली.

Related posts

आरोग्य सेवे चे कार्य प्रशंसनिय:माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस च्या आरोग्य सेवेला उस्फुर्त प्रतिसाद..!

bol maharashtra

आर्णी येथील रक्तदान शिबीरात.. ११२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

bol maharashtra

सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..!

bol maharashtra