Bol Maharashtra
धर्म - कर्म सामाजिक

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समिती गठीत

*क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समिती गठीत*

सामुहिक व एकल गोंडी नृत्य स्पर्धेचे आयोजन*

*विद्यार्थी व सामाजिक प्रबोधन सत्र

यवतमाळ-
आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आद्य क्रांतिकारक शहीद बाबुराव शेडमाके यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर बाबुराव शेडमाके उत्सव समिती वाघापूर गठीत करण्यात आली.
यावेळी कोया पुनेम गोटुल समिती राज्य अध्यक्ष प्रल्हादराव सिडाम यांचे अध्यक्षतेत व जेष्ठ साहित्यिक बाळकृष्ण गेडाम,गुलाबराव मेश्राम, लक्ष्मण कुळसंगे,राजु चांदेकर, सुधाकर मेश्राम,शंकर कोटनाके, बाळु वट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष पवनकुमार आतराम उपाध्यक्ष भिमराव मरसकोल्हे,बंडुभाऊ मसराम, सचिव निकीताताई उईके सहसचिव संगिताताई मेश्राम कोषाध्यक्ष अजय उईके यांची निवड झाली.
आयोजन समिती मध्ये नरेश उईके,विनोद मडावी,किशोर उईके,दिलीप शेडमाके,संजय मडावी,गजानन कोटनाके,राजेश मडावी,विजय पेंदाम,गुलाबराव घोडाम,दिलीपराव मसराम,कृष्णा पुसनाके,सचिन आतराम,राहुल मेश्राम,कैलास टेकाम,सचिन कोवे,विनोद उईके,अभिषेक मरसकोल्हे, किशोर पेंदोर,शरद टेकाम,राहुल कुमरे, उमेश मेश्राम यांची निवड करण्यात आली.
यावेळी क्रांतिकारक बाबुराव शेडमाके चौक वाघापूर येथे ११ व १२ मार्चला कार्यक्रम घेण्याचे ठरले. ११ मार्चला सकाळी १० वाजता आरोग्य शिबीर सांयकाळी ५ वाजता एकल नृत्य स्पर्धा व १२ मार्च ला सकाळी १० वाजता क्रांतिकारक बाबुराव शेडमाके जयंती कार्यक्रम सांयकाळी ५ वाजता सामुहिक नृत्य स्पर्धा तसेच विद्यार्थी व सामाजिक मार्गदर्शन प्रबोधन सत्र घेण्याचे ठरले.
यावेळी क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त समिती ने विविध उपक्रम घेतले जाणार आहे. त्यामुळे आदीवासी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
असे प्रसिद्ध प्रमुख कृष्णा पुसणाके व भरत गेडाम यांनी कळविले.

Related posts

गोरक्षकांनी दिले ६२ गाईंना जीवदान,पोलिसांनी केली सुटका…!

bol maharashtra

अखेर शिक्रापूरचा कचरा उचलण्यास सुरुवात प्रहार च्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी ..!

bol maharashtra

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्य भेट…..

bol maharashtra