क्रिकेट जरी अनिश्चिततेचा खेळ असला तरी अस्ट्रेलीया संघ बलाढय मानला जातो. तर दुसरी कडे श्रीलंकेने देखील नेहमीच प्रस्तिकात्मक खेळ खेळत सामने पलटुन विजय मिळवला आहे.
सनथ जयसूर्या असो की मलिंगा अथवा श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याचे नाव इतिहासात नोंदले आहे.
२०२६ चा श्रीलंका संघ नवखा असला तरी चिवट आहे त्यांनी कमालीचे प्रदर्शन करत अस्ट्रेलीया ला पराजित केले.
बलाढ्य कांगारुंना श्रीलंकेच्या धुरंधुरांनी रडवलं, ऑस्ट्रेलियावर वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची वेळ
SL vs Australia T20 World Cup 2026: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला आणि हा सामना श्रीलंकेने जिंकला. विश्वचषकातील सर्वात मोठा अपसेट होता. आता यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाला सुपर 8 ची फेरीत गाठता येईल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये पराभव पत्करावा लागला. हा सध्या सुरू असलेल्या T20 World Cup 2026 सर्वात मोठा अपसेट होता. जर मंगळवारीच्या सामन्यात झिम्बाब्वेने आयर्लंडला हरवले तर ते सुपर 8 मध्ये पोहोचणारा ग्रुप बी मधील दुसरा संघ बनेल. झिम्बाब्वेचे दोन सामने शिल्लक आहेत आणि सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना फक्त एक विजय आवश्यक आहे.
ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत कसा पोहोचेल?
जर झिम्बाब्वे आयर्लंडविरुद्ध हरला तर ऑस्ट्रेलियाला थोडी मोकळीक मिळेल. झिम्बाब्वे त्यांचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळेल आणि ऑस्ट्रेलियाला आशा करावी लागेल की श्रीलंका त्यांच्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला हरवेल. जरी आयर्लंड झिम्बाब्वेविरुद्ध जिंकला तरी तो मोठा विजय नसावा. ऑस्ट्रेलिया त्यांचा शेवटचा सामना ओमानविरुद्ध खेळेल. आणि जर ऑस्ट्रेलियाने ओमानला हरवले तर ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांचे प्रत्येकी 4 गुण होतील. या परिस्थितीत, चांगल्या रनरेटच्या आधारे ऑस्ट्रेलिया सुपर 8 मध्ये प्रवेश करू शकते.
पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. श्रीलंकेसाठी हा विजय ऐतिहासिक आहे, कारण त्यांनी यापूर्वी कधीही टी-20 विश्वचषकात इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या प्रभावी विजयाचा हिरो पथुम निस्सांका होता, ज्याने श्रीलंकेला विजय मिळवून दिला. फक्त 52 चेंडूत 100 धावांची उल्लेखनीय खेळी केली. यासह, पथुम निस्सांका टी20 विश्वचषक 2026 चा पहिला शतकवीर ठरला.