Bol Maharashtra
राजकारण

स्व.दादांचे ते स्वप्न राहिले अपूर्णच…!

राज्याच्या राहकारनात  मोठी धक्कादायक घटना घडली ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचे निधन

खासदार राज्याचे विविध खात्याचे मंत्री ते ६ वेळा उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री म्हणून स्व.अजित दादा यांनी काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस मधून ते बाहेर पडले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे दोन पक्ष झाले लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले.

मात्र अफाट कार्यक्षम असून देखील स्व.अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही.ते स्वप्न देखील अपूर्ण राहिले मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकवेळा त्यांनी बोलून देखील दाखवली होती.

महा नगर पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत पुणे व पिंपरी चिंचवड येथे एकत्र आली होती.भविष्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यावर दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्या म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते त्यादृष्टीने देखील त्यांनी प्रयत्न सुरू केले होते.

१७ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार व त्या पक्षाचे मोठे नेते बैठकीत उपस्थित होते मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते मात्र या बैठकीत हजर नव्हते

यावरून इतरांच्या मनात नसले तरी अजित पवार यांच्या मनात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात ही भावना होती हे खरे असून हे स्वप्न पूर्ण होणार का याकडे लक्ष लागले आहे.

Related posts

निवडणुकीच्या घोषणा होण्याआधी राज्य निवडणूक कार्यालयात मनसे चा खळखाट्याक…!

bol maharashtra

एकट्या रुपाली चाकनकरच का सर्वांची चौकशी व राजीनामा झाला पाहिजे: रेवननाथ गायकवाड.

bol maharashtra

सुशासन ‘बाबू’ जाणार राज्यसभेवर,भाजप च्या हाती सत्तेची चाबी, उपमुख्यमंत्री निशांत कुमार होणार…!

bol maharashtra