Bol Maharashtra
मोठी बातमी राजकारण राष्ट्रीय

सुशासन ‘बाबू’ जाणार राज्यसभेवर,भाजप च्या हाती सत्तेची चाबी, उपमुख्यमंत्री निशांत कुमार होणार…!

लालू प्रसाद यादव यांच्या सत्तेला ‘जंगलराज’ म्हणून संबोधत नितीश कुमार यादव यांनी सत्ता पालट करून स्वतःची ओळख सुशासन बाबू म्हणून निर्माण केली.सतत पाच वेळा मुख्यमंत्री होण्याचा त्यांचा बिहार राज्यात इतिहास झाला आहे.

सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी कधी भाजप तर कधी लालू प्रसाद यादव याच्या राजद व काँग्रेस सोबत युती केली म्हणून त्यांना विरोधक ”पलटूराम’ म्हणत  चाचा म्हणून लालू चे चिरंजीव तेजस्वी यादव त्यांच्या वर नेहमी टीका करत.

नितीश कुमार हे केंद्रात मंत्री देखील होते.देशाचे पंतप्रधान म्हणून देखील त्यांच्या कडे पाहिल्या जाई. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार नितीश बाबु यांच्या पाठींबा मिळाल्या मूळे भाजप चे सरकार स्थापन होऊ शकले.

मात्र विधानसभा निवडणुकीत बिहार मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले असताना नितीश कुमार यांना भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री केले.

मात्र वाढते वय त्यामुळे अनेक वादग्रस्त कृती व वक्तव्य यामुळे ते अडचणीत आले असतांना व भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्री करण्याचा मनसुबा आता पूर्ण होणार आहे.

वाढते वय व वादग्रस्त कृती यामुळेच व मुलाला राजकारणात लॉन्च करण्यासाठी  नितीश बाबू राज्य सभे वर जातील त्याच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होतील तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यादव चे चिरंजीव निशांत कुमार यादव उपमुख्यमंत्री होतील.जेष्ठ समाज वादी नेते व जनता दलाच्या स्थापणे पासून ते समाजवादी विचारसरणी चे आहेत.

Related posts

अखेर चंद्रपुरात भाजप व शिवसेना उबाठा एकत्र..?

bol maharashtra

अद्विता बँकेने जपली सामाजिक बांधिलकी, जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा केला सत्कार,नारी शक्ती चा जागर…!

bol maharashtra

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन मधून क्रिकेट चा थरार…ए.पी.ए.चे आयोजन…

bol maharashtra