Bol Maharashtra
महाराष्ट्र मोठी बातमी राजकारण

अजित दादांच्या विमान अपघाताचा अहवाल की दिशाभूल,अपघात की घातपात..?आ. रोहित पवार यांचे गंभीर आरोप…!

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे एक कणखर रोखठोक व वक्तशीर नेतृत्व अनेकांचा आधार तर कडक तेव्हढे मवाळ व प्रेमळ व संवेदनशील नेता  त्यांचे बारमती विमानतळावर अपघाती निधन झाले

त्यानंतर महाराष्ट्र हळहळला लगेच राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अद्यक्ष कोण..?

तर राष्ट्रवादी काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस याच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली तर दुसरी कडे

समाजमाध्यमावर अजित दादांच्या विमान अपघाता वर प्रश्न निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे विलिनीकरणं  याचीही चर्चा रंगली होती.

मात्र विमान अपघाता च्या खोलात जाऊन चौकशी करा अशी मागणी। त्यांच्या कडून करण्यात आली त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विमान वाहतूक मंत्री यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करून अजित दादा ज्या विमानातून प्रवास केला त्या विमान कंपनी च्या मालका विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे व तपास सीबीआय कडे देण्यात यावा ही देखील मागणी केली.

आज त्यांनी वाय बी चव्हाण सेंटर मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली.

आज त्यांनी अपघात अहवालात विमान झाडावर कोसळले असे म्हटले असून विमानतळावर एकही झाड नाही तेथे फक्त झुडपे आहेत व काही लोकांनी बारामती विमानतळ वर येऊन रेकी केल्याचा गौप्यस्फोट करत याची चौकशी करण्यात यावी हा अपघात की घातपात असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सोबत शिवसेना मुख्यनेते व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान पाडण्याची धमकी दिली होती ही धमकी इराण ने दिली होती असेही रोहित पवार म्हणाले व प्रफुल पटेल केंद्रीय हवाई मंत्री असतांना त्यांच्या काळात जेट विमान खरेदी घोटाळा झाला असल्याचा आरोपही यावेळी रोहित पवार यांनी केला.

Related posts

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

मराठा सेवा संघाच्या माढा तालुका सचिवपदी सहाय्यक अभियंता सुरज मोहिते.

bol maharashtra

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन ने चलाया सदस्यता अभियान

Web1Tech